बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीपासून सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:13 IST2021-03-25T04:13:42+5:302021-03-25T04:13:42+5:30

अमरावती : अपंग बांधवांना बनावट प्रमाणपत्र देऊन फसविणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली आहे. अपंग बांधवांनी अशा दलालांपासून सावध राहावे ...

Beware of gangs issuing fake certificates | बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीपासून सावधान

बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीपासून सावधान

अमरावती : अपंग बांधवांना बनावट प्रमाणपत्र देऊन फसविणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली आहे. अपंग बांधवांनी अशा दलालांपासून सावध राहावे व त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी केले आहे.

चार अपंग बांधवांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याबाबत तिवसा पोलीस ठाण्याकडून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला पत्र प्राप्त झाले होते. ही प्रमाणपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यावरील स्वाक्षरी व शिक्केदेखील बनावट आढळून आलेत. त्यामुळे अशी टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली असून, अपंग बांधवांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी केले आहे.

अडचण आल्यास थेट संपर्क करा

अपंग बांधवांना प्रमाणपत्राविषयी काहीही अडचण आल्यास त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कक्ष क्रमांक २९ येथील सामाजिक सेवा विभागाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहनही निकम यांनी केले आहे.

Web Title: Beware of gangs issuing fake certificates