कानफोड्यांपासून सावधान
By Admin | Updated: June 1, 2015 23:58 IST2015-06-01T23:58:53+5:302015-06-01T23:58:53+5:30
कान साफ करणाऱ्यांकडे वैद्यकीय शिक्षणाची कोणतीही पदवी नाही. शाळेची पायरीही त्यांनी कधी चढली नाही. जागा

कानफोड्यांपासून सावधान
मळ काढण्याऐवजी अनेकांचे फोडले कान : ग्रामीण भागात फसवणुकीचे प्रकार अधिक
अमरावती : कान साफ करणाऱ्यांकडे वैद्यकीय शिक्षणाची कोणतीही पदवी नाही. शाळेची पायरीही त्यांनी कधी चढली नाही. जागा मिळेल त्या ठिकाणी ते दुसऱ्यांच्या कानावर उपचार करतात. कानातील मळ काढण्याऐवजी ते थेट कानच फोडून टाकतात. कारण कान साफ करण्याचे ज्ञान नसल्याने त्यांनी अनेकांना बहिरे बनविले आहे. अशा अनेक केसेस डॉक्टरांकडे दाखल होत आहेत. यात कानफोड्यांपासून सावध राहा, असा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे.
शहरातील रेल्वेस्टेशन, बसस्थानक, बाजार आदी ठिकाणी हे कानातील मळ काढणारे तथाकथित डॉक्टर आढळून येतात. सुरुवातीला २0 रुपयांत मळ काढून देतो, असे त्यांच्याकडून सांगितले जाते; परंतु त्यानंतर ते कानात स्वत:जवळील काही औषध टाकतात. त्या औषधाने फेस येतो. त्यामुळे ते कानात जास्त मळ असून, गोळी तयार झालेली आहे. ती मोठी असल्याने ५० रुपयांपर्यंत खर्च येईल, असे सांगतात. घासघूस करीत त्यातून काही पैसे कमी केले जातात. अशा प्रकारचे नाटक करीत शहरातील रेल्वेस्टेशन, बसस्थानक, रविवार बाजार आदी ठिकाणी हे कानातील मळ काढणारे तथाकथित डॉक्टर आढळून येतात. सुरुवातीला २0 रुपयांत मळ काढून देतो, असे त्यांच्याकडून सांगितले जाते; परंतु त्यानंतर मात्र ते कानात स्वत:जवळील काही औषध टाकतात. त्या औषधामुळे कानात फेस येतो. याची भीती दाखवीत तुमच्या कानात खूप सारे मळ असल्याचे सांगून ते काढणे गरजेचे असल्याचे सांगतात. त्यासाठी अतिरिक्त पैशाची मागणीही ते करतात. त्यालाच नागरिक बळी पडतात. मात्र जबरीने मळ काढताना कान फोडल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे सावधगिरी बाळगावी
ग्रामीण भागातील
सावज शोधतात
४कानातील मळ काढणारे हे मुन्नाभाई बसस्थानक, आरटीओ अशा ठिकाणी ग्रामीण भागातील व्यक्तीला गाठतात. त्यांना भावनिक करीत त्यांच्याकडून जादा पैसे उकळण्याचे काम ते करतात. ग्रामीण भागातून येणाऱ्यांना जादा माहिती नसल्याने, ते सहजच या तथाकथित डॉक्टरांच्या जाळ्यात अडकतात.
ओळखू न येण्यासाठी खबरदारी
४हे मुन्नाभाई दररोज एकाच ठिकाणी नसतात. दररोज एकाच भागात गेल्याने आपल्याला ओळखतील म्हणून, ते १५ ते २० दिवस पूर्वीच्या ठिकाणी जात नाहीत. आपले पितळ उघडे पडू नये यासाठी त्यांच्याकडून ही खबरदारी घेतली जाते.
अन् दुसऱ्याच दिवशी फुटला कान
४शहरातील एक तरुण दोन महिन्यांपूर्वी बाजारात गेला होता. तेथे त्याला कानातील मळ काढणारा एक डॉक्टर भेटला. २0 रुपयांत मळ काढून देतो, असे त्याच्याकडून सांगण्यात आले. मळ काढण्यास सुरुवात केल्यानंतर, कानात खूप मोठी मळाची गोळी तयार झाली आहे. त्यासाठी औषध टाकावे लागेल व ५0 रुपयांपर्यंत खर्च येईल, असे त्याच्याकडून सांगण्यात आले. घासाघिसीनंतर काही पैसे कमी करून, त्याने जवळील औषध टाकून मळ काढला; परंतु दुसऱ्याच दिवशी त्या तरुणाचा कान फुटला.
कोणत्याही साधनाने कान कोरणे हे चांगले नाही. त्यामुळे पडद्याला छिद्र पडून, कायमचा बहिरापणा येतो. तसेच त्यामुळे कानाच्या जवळील मेंदूलाही त्याचे इन्फेकशन पोहोचू शकते. त्यामुळे कान कोरणे ही सवय चांगली नसून, कानातील मळ काढणाऱ्या बाहेरील व्यक्तीवर विश्वास ठेवू नये.
-एम.एम. पाटील
कान, नाक, घसा तज्ज्ञ, अमरावती.