शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

गाडगेनगरच्या सिमेत क्रिकेटवर सट्टा; कोतवालीत चोरांची दिवाळी! दुचाकी चोरीचे सत्र थांबेना

By प्रदीप भाकरे | Updated: October 25, 2022 19:06 IST

२३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत एका २६ वर्षीय क्रिकेट सटोडियाला अटक करण्यात आली.

अमरावती : गाडगेनगर पोलिसांच्या हद्दीतील डागा सफायर अपार्टमेंटमधील एका सदनिकेत चालणाऱ्या क्रिक्रेट सट्ट्यावर सीपींच्या विशेष पथकाने धाड घातली. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत एका २६ वर्षीय क्रिकेट सटोडियाला अटक करण्यात आली. तर दुसरीकडे दुचाकीचोरीचे सत्र सुरू असताना शहर कोतवालीच्या हद्दीतून चक्क ऑटो चोरीला गेला. तर, शहरात बहुतांश ठिकाणी वाहतुकीचा बोजवारा उडालेला दिसला.

T20 विश्वचषकादरम्यान, २३ ऑक्टोबर रोजी आस्ट्रेलियातील मेलबर्न येथे भारत पाक ही हायव्होल्टेज लढत झाली. त्या सामन्यावर डागा सफायर अपार्टमेंटमधील सी माळ्यावरील ६०५ क्रमांकाच्या सदनिकेत ऑनलाईन बेटिंग (जुगार) केली जात असल्याची माहिती पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाला मिळाली. पथकप्रमुख सहायक पोलीस निरिक्षक योगेश इंगळे यांनी सहकाऱ्यांसमवेत त्या सदनिकेत धाड मारली. तेथे आरोपी रोहन दिनेश गणेडीवाल (२६, फ्लॅट नं. ६०५, डागा सफायर अपार्टमेंट) हा मोबाईल व लॅपटॉपवर भारत पाक सामन्यावर ऑनलाईन जुगार खेळत व खेळवत असताना आढळून आला. एका संकेतस्थळावर वेगवेगळ्या आयडीच्या साह्याने तो बेटिंग करत असल्याचे आढळून आल्याने त्याला लॅपटॉप व मोबाईलसह ताब्यात घेण्यात आले. 

पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात एपीआय इंगळे यांच्यासह रणजीत गावंडे, सुरज चव्हान, राजीक रायलीवाले, निखिल गेडाम यांनी ही कारवाई केली. गाडगेनगर पोलिसांना त्या क्रिकेट बेटिंगची कानोकान खबर मिळाली नाही.

असा ठेवला आरोप -आरोपी रोहन गणेडीवाल हा भारत पाक २०/२० सामन्यावर सट्ट्याची खयवाडी व लगवाडी करताना आढळून आला. तो अवैधरित्या क्रिकेट बेटिंग, सट्टा चालवत असून कोणताही कर भरत नाहीत. तो शासनासह लोकांची देखील फसवणूक करत आहे. त्याने वेगवेगळ्या बोगस आयडी तयार करून त्या स्वत:च्या फायद्यासाठी वापरल्या. तथा त्या बोगस आयडी वापरून तो लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. गाडगेनगरचे पोलीस निरिक्षक पुनित कुलट यांनी याप्रकरणी गणेडीवालविरूध्द २३ ऑक्टोबर रोजी फसवणूक व जुगार कायद्यान्वये गु्न्हा दाखल केला.

धनतेरसला कोतवाली हद्दीतून गमावली रोजी -मासोद येथील ऑटोचालक गुणवंत तायडे हे २३ ऑक्टोबर रोेजी शहरात किराणा आणण्यासाठी आले असता त्यांनी आपली रोजीरोटी असलेला ऑटो इतवारा बाजारातील आरामशिन गल्लीमध्ये ठेवला. किराणा घेऊन ते परतले असता सायंकाळी ७ च्या सुमारास त्यांना आपला ऑटो ठेवलेल्या ठिकाणी दिसला नाही. ते हवालदिल झालेत. त्यांची रोजीरोटीच चोरीला गेली होती. जड अंतकरणान तायडे यांनी शहर कोतवाली गाठले. दिवाळीच्या दिवशी दुपारी दिडच्या सुमारास त्यांची तक्रार नोंदविली गेली. त्यांची दिवाळी कोतवालीचा उंबरठा झिजविण्यात गेली. तर जुना कॉटन मार्केट परिसरात दिवाळीच्या दिवशी सकाळी फुले घेत असताना विजय खंडेलवाल (६१) यांचा महागडा मोबाईल चोरीला गेला. कोतवाली हद्दीत भुरट्यांनी दिवाळी केली.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीPoliceपोलिस