श्रीमंतांना झुकते माप

By Admin | Updated: July 13, 2016 01:09 IST2016-07-13T01:09:09+5:302016-07-13T01:09:09+5:30

पालकमंत्री प्रवीण पोटे आणि गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या आदेशान्वये महापालिका यंत्रणेने अतिक्रमण ...

The bent measurements of the rich | श्रीमंतांना झुकते माप

श्रीमंतांना झुकते माप

अतिक्रमण मोहिमेबद्दल संशय : पथकाने पाठ फिरविताच ‘जैसे थे’
अमरावती : पालकमंत्री प्रवीण पोटे आणि गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या आदेशान्वये महापालिका यंत्रणेने अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली. मात्र आठवड्यापासून सुरुअसलेल्या या कारवाईत दुजाभाव केला जात आहे. श्रीमंतांना झुकते माप दिले जात असल्याचा प्रत्यय वारंवार येत असल्याने महापालिका यंत्रणेच्या भूमिकेविषयी संशय निर्माण झाला आहे.
उभय मंत्र्यांच्या निर्देशाआधी पालिकेच्या यंत्रणेकडून किडूकमिडूक अतिक्रमण हटविण्यात येत होते. गुडेवारांची बदली झाल्यानंतर तर मोहिमेला ब्रेकच लागला. मोठी ओरड झाल्यानंतरच अतिक्रमणाची मोहिम राबविली जात होती. मात्र पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी थेट महापालिका गाठून आढावा बैठक घेतली व शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महिन्याचा अल्टीमेटम दिला. बैठकीनंतर दुसऱ्याच दिवसापासून धडाक्यात मोहीम राबविली गेली. तथापि पहिल्याच दिवसापासून पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे व यंत्रणेतील अन्यकडून अतिक्रमण काढतेवेळी सापत्नभाव होत असल्याचा प्रत्यय आला. पंचवटीतील अन्य अतिक्रमणावर हातोडा फिरवितांना रोशनीचा ओटा वगळण्यात आला. बोंबाबोंब झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो ओटा पाडण्यात आला. कुत्तरमारेंच्या नेतृत्वातील पथकाला इतवाराबाजार, पठाण चौक, टांगापाडाव पुढे चांदणी चौकातील अतिरिक्त बांधकाम व फुटपाथ गडप केल्यांवर कारवाई करता आली नाही. या भागात अनेक विशिष्ठ समुदयातील नागरिकांनी पक्री घरे बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. फुटपाथ तर शोधूनही सापडत नाही. अतिक्रमणधारकांनी कब्जात घेतलेला फुटपाथ कुत्तरमारे अ‍ॅन्ड टीम मोकळा करू शकले नाही.

कुबडे ज्वेलर्सला मुभा का?
कुबडे ज्वेलर्सने दुकानासमोर बनविलेला अर्धाच ओटा अतिक्रमण निर्मूलन पथकाने तोडून टाकला. मात्र वर रेलिश आणि रिलायन्सट्रेंडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण जैसे थे ठेवण्यात आले. याबाबत कुत्तरमारेंना विचारणा केली असता वरील दुकानांकडे व पार्किंगकडे जाण्यासाठी तो ओटा आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावरुन कुत्तरमारेंना कुबडे ज्वेलर्स व त्यांच्या अन्य भाडेकरुंच्या हिताचा किती विचार आहे, याचा प्रत्यय येतो.
तोंडदेखल्या कारवाई
इतवारा बाजार, चांदणी चौक, नागपुरी गेट, टांगा पडाव चौकातील अतिक्रमण धारकांना सोमवारी सूचना देण्यात आल्या. त्यामुळे अनेक फेरीवाल्यांनी हातगाड्यांच लावल्या नाही. तर अनेकांनी दुकानबाहेर साहित्य काढले नाहीत. पथक येवून गेल्यानंतर दुपारी पुन्हा अतिक्रमण पुन्हा थाटण्यात आले.

Web Title: The bent measurements of the rich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.