बेनोडा पोलिसांनी पकडली २४० लिटर गावठी दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:11 IST2021-05-01T04:11:50+5:302021-05-01T04:11:50+5:30

वरूड/बेनोडा : बेनोडा पोलिसांची नाकेबंदी सुरू असताना शुक्रवारी सकाळी ८ वाजता पोलीस ठाण्यासमोर मोर्शीकडून येणारी व्हॅन थांबविली. ...

Benoda police seized 240 liters of village liquor | बेनोडा पोलिसांनी पकडली २४० लिटर गावठी दारू

बेनोडा पोलिसांनी पकडली २४० लिटर गावठी दारू

वरूड/बेनोडा : बेनोडा पोलिसांची नाकेबंदी सुरू असताना शुक्रवारी सकाळी ८ वाजता पोलीस ठाण्यासमोर मोर्शीकडून येणारी व्हॅन थांबविली. यामध्ये सहा रबरी ट्यूबमध्ये २४० लिटर गावठी दारू असल्याचे आढळून आले. यामध्ये चालकाला ताब्यात घेऊन वाहनासह १ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीचे नाव दीपक श्यामराव मोरे (३५, रा. जरूड) असे आहे. सदर आरोपी एमएच १७ व्ही १२४५ क्रमांकाच्या व्हॅनमध्ये गावठीचे दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती ठाणेदार मिलिंद सरकटे यांना मिळाली. यावरून पोलीस ठाण्यासमोर नाकाबंदी करण्यात आली. ठाणेदार मिलिंद सरकटे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दिलीप श्रीराव, जमादार दिवाकर वाघमारे, कर्मचारी संतोष औंधकर यांनी ही कारवाई केली.

Web Title: Benoda police seized 240 liters of village liquor