चार सदस्यीय कुटुंबालाही एसटी सवलत योजनेचा लाभ

By Admin | Updated: September 16, 2014 23:24 IST2014-09-16T23:24:49+5:302014-09-16T23:24:49+5:30

वार्षिक सवलत कार्ड योजनेचा लाभ आता चार सदस्यीय कुटुंबालाही देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. ५०० रूपयांच्या मोबदल्यात वर्षभर दहा टक्के सवलत दरात संबंधितांना एसटीतून

Benefits of ST concession scheme to four-member family | चार सदस्यीय कुटुंबालाही एसटी सवलत योजनेचा लाभ

चार सदस्यीय कुटुंबालाही एसटी सवलत योजनेचा लाभ

परिवहन महामंडळाचा निर्णय : प्रवासी, कर्मचाऱ्यांनाही दिलासा
अमरावती : वार्षिक सवलत कार्ड योजनेचा लाभ आता चार सदस्यीय कुटुंबालाही देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. ५०० रूपयांच्या मोबदल्यात वर्षभर दहा टक्के सवलत दरात संबंधितांना एसटीतून प्रवास करता येणार आहे. जास्तीत जास्त प्रवासी आकर्षित करून राज्य परिवहन महामंडळ आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी विविध योजना राबवीत आहे. त्यानुसार नवनवीन योजनांही सुरूवात करण्यात येत आहेत.
नवीन निर्णयानुसार राज्य परिवहन महामंडळाने आता वार्षिक सवलत कार्ड योजनेच्या नूतनीकरणाचेही दर कमी केले आहेत. पहिल्या वेळी १८०, दुसऱ्यांदा १६० आणि तिसऱ्या वेळी तसेच त्यानंतरच्या नुतनीकरणासाठी १५० रूपये आकारले जाणार आहेत. याशिवाय दीड लाख रूपयांच्या विम्याचे कवचही संबंधित प्रवाशाला लाभणार आहे.
ही सवलत योजना सर्व प्रकारच्या बससेवांसाठी लागू राहणार आहे. दरम्यान शिवनेरीसाठी ५०० रूपयांत पाच टक्के सवलतीत प्रवास करता येईल. प्रवासी वाढवा अभियानही सध्या प्रगतिपथावर असून याचा फायदा एसटी तसेच प्रवाशांनाही होत आहे. हे अभियान दरवर्षी राबविले जात असले तरी यंदा ते अधिक गतीने राबविण्याचे प्रयत्न राज्य परिवहन मंडळातर्फे सुरू आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Benefits of ST concession scheme to four-member family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.