शेतकऱ्यांना ‘किसान एसएमएस’ योजनेचा लाभ
By Admin | Updated: June 25, 2015 00:09 IST2015-06-25T00:09:34+5:302015-06-25T00:09:34+5:30
शेतकऱ्यांना शेतीविषयक दररोज अपडेट माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील दीड लाख शेतकरी ‘किसान एसएमएस’ योजनेशी जोडण्याचे उद्दिष्ट....

शेतकऱ्यांना ‘किसान एसएमएस’ योजनेचा लाभ
अपडेट माहिती : कृषी विभाग करणार दररोज मार्गदर्शन
धामणगाव रेल्वे : शेतकऱ्यांना शेतीविषयक दररोज अपडेट माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील दीड लाख शेतकरी ‘किसान एसएमएस’ योजनेशी जोडण्याचे उद्दिष्ट कृषी विभागासमोर असून पुढच्या सात दिवसांत या शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर कृषी सहायकांना घ्यावे लागणार आहेत.
शेतकऱ्यांना शेती संदर्भात वेळोवेळी माहिती उपलब्ध व्हावी, दरवर्षी शेतात होणाऱ्या उत्पन्नात भर पडावी, कोणते बियाणे शेतात पेरावे, किती दिवसानंतर खते द्यावीत कीड संरक्षणाचा उपाय याविषयीची माहिती आता शेतकऱ्यांना दररोज मिळावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पुढाकार घेतला आहे़ त्या संदर्भात कृृषी विभागाला आवश्यक ते निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यातील सर्व कृषी उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या उपविभागात कृषी सहायकांची बैठक घेऊन किसान एसएमएस योजनेकरिता शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर घेण्याचे आदेश दिले आहेत. यात शेतकऱ्यांचे नाव, मोबाईल नंबर, घेत असलेली पिके अशी विविध माहिती अर्जामध्ये नमूद क रून कृषी विभागाला सादर करावयाची आहे़ विशेषत: शेतकऱ्यांना शेती संदर्भात एखादी माहिती गरजेची असल्यास कृषी विभागाचा ‘व्हॉटस् अॅप’ नंबरही राहणार आहे़ याद्वारे शेतकऱ्यांना त्वरित सर्व माहिती मिळणार आहे़ ३० जूनपर्यंत दीड लाख शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर घेऊन संपूर्ण डाटा आॅन लाईन करण्याचे आदेश दिले आहेत.
शेतकऱ्यांना शेतीची दररोज माहिती मिळावी या उद्देशाने ‘किसान एसएमएस’ योजनेसाठी शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर घेऊन संपूर्ण डाटा आॅनलाईन करावयाचा आहे़ याविषयी कृषी सहायक ांची बैठक घेऊन निर्देश दिले आहेत़
-अनिल खर्चान,
उपविभागीय कृषी अधिकारी
प्रत्येक शेतकऱ्याची माहिती अपडेट करणे सुरू असून शेतकऱ्यांनी आपले मोबाईल क्रमांक कृषी सहायकाकडे देऊन ‘किसान एसएमएस’ योजनेचा लाभ घ्यावा
-गोरख वावरे,
अध्यक्ष, कृषी सहायक संघटना