२० हजार रुग्णांनी घेतला ‘१०८’ रुग्णवाहिका सेवेचा लाभ
By Admin | Updated: April 16, 2016 00:11 IST2016-04-16T00:11:00+5:302016-04-16T00:11:00+5:30
आपात्कालि परिस्थितीत रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शासनाने राज्यभरामध्ये अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवा सुरू केली.

२० हजार रुग्णांनी घेतला ‘१०८’ रुग्णवाहिका सेवेचा लाभ
जीवनदायिनी : २७ अॅम्ब्युलन्समध्ये अत्याधुनिक सुविधा
अमरावती : आपात्कालि परिस्थितीत रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शासनाने राज्यभरामध्ये अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवा सुरू केली. या रुग्णवाहिकेसाठी १०८ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला. मागील वर्षभरात जिल्ह्यातील १९ हजार ८७ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला.
गरजू रूग्णाने १०८ या क्रमांकावर संपर्क साधल्यास २० ते २५ मिनिटांमध्ये रूग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करून देण्यात येते. रुग्णांना जीवनदान देण्याचे कार्य या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून होत आहे. संकटकाळात या रुग्णवाहिका रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरल्या आहेत. जिल्ह्यात २७ सुसज्ज रुग्णवाहिका कार्यरत आहेत.
रुग्णवाहिकेत अत्याधुनिक उपकरणे
२७ रूग्णवाहिकांमध्ये अत्याधुनिक उपकरणे आहेत. यात कृत्रिम श्वासोच्छवास यंत्र, रक्तदाब यंत्र, सलाईनची व्यवस्था आहे. त्यामुळे रूग्णवाहिकेमध्येच प्रारंभीक उपचार केले जातात.