१३७ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:11 IST2021-01-14T04:11:35+5:302021-01-14T04:11:35+5:30
अमरावती: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतगर्त विविध पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या १३७ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करण्यात आला ...

१३७ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ
अमरावती: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतगर्त विविध पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या १३७ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये विविध संवर्गातील शिक्षकांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या शिक्षकांना शासन धोरणानुसार, १२ वर्षे सलग सेवा झाल्यानंतर वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ दिला जातो. त्यानुसार, वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी प्राथमिक शिक्षकांचे विविध पंचायत समितींकडून पात्र शिक्षकांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. यामध्ये केंद्रप्रमुख २,उच्चश्रेणी मुख्याध्यापक १२, पदवीधर शिक्षक १४ आणि सहायक शिक्षक १०९ आदी १३७ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे. याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहमतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी ई.झेड खान यांनी प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून, जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्याचे प्रस्ताव निकाली काढले आहेत. मात्र, २४ वर्षांनंतर दिल्या जाणाऱ्या निवड श्रेणीच्या लाभाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.