शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

जुलैच्या आपत्तीसाठी मिळणार विम्याचा लाभ

By admin | Updated: August 2, 2016 23:58 IST

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.

पंतप्रधान पीक विमा योजना : प्राथमिक अहवालात ८ हजार हेक्टर बाधितअमरावती : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पिकाला नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळते. त्यामुळे जुलै महिन्यात नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जी शेतजमीन खरडून गेली, अशा जमिनीला प्रतिनिधिक निर्देशांकाच्या आधारे अपेक्षित नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत नुकसान भरपाईची रक्कम आगाऊ रक्कम म्हणून देण्यात येणार आहे. जिल्ह्यात किमान ८ हजार हेक्टर क्षेत्राचा याचा लाभ होणार आहे.जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजना अधिसूचित मंडळातील अधिसूचित पिकाकरिता राबविण्यात येत आहे. या योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या विमा संरक्षणाच्या बाबीमध्ये वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून विमा कंपनीद्वारा महसूल व कृषी विभागाच्या मदतीने नुकसान भरपाई निश्चित करण्यात येणार आहे.या विमा योजनेत सहभागी होण्यासाठी २ आॅगस्टही ही शेवटची तारीख असली तरी ज्या शेतकऱ्यांनी या योजनत सहभाग नोंदविला, त्या शेतकऱ्यांना नदी नाल्यांच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई नुकसान मर्यादेच्या २५ टक्के प्रमाणात मिळणार आहे. यासाठी योजनेत सहभागी शेतकऱ्यांना घटना घडल्यापासून ४८ तासांच्या आत याबाबतची सूचना दिनांक, वेळ, नुकसानीचे कारण, प्रकार, प्रमाण व सर्व्हे नंबरसहीत विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी, महसूल विभाग किंवा कंपनीचे टोल फ्री क्रमांक ०२०-६९०००,फॅक्स क्रमांक ०२०-३०५६५१४३ व टोल फ्री क्रमांक १८००-२७००-४६२ या क्रमांकावर कळवावी लागणार आहे.शेतकऱ्यांनी नूकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह ७/१२, पिकाची नोंद असलेला विमा हप्ता भरलेला पुरावा, विमा कंपनीला सादर करणे आवश्यक आहे. तसेच शेतकरी विहीत नमुन्यात माहिती सादर करू न शकल्यास उपलब्ध माहितीच्या आधारे अर्ज सादर करू शकतो. परंतु अर्जातील उर्वरित माहिती ८ दिवसांच्या आत विमा कंपनीस सादर करणे अनिवार्य राहील व पीक नुकसानीचा पुरावा म्हणून घेतलेली छायाचित्रे देता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा अनुदान मिळण्याची प्रक्रिया सोयीस्कर होणार आहे. (प्रतिनिधी)अमरावतीत चार हजार हेक्टर बाधितमहसूल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार १ ते १२ जुलै या कालावधीत आपत्तीमुळे ११ हजार १७ शेतकऱ्यांच्या ७ हजार ८७० हेक्टर क्षेत्राचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले होते. कापूस, तूर व सोयाबीन पिकाचे हे नुकसान झाले आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात सर्वाधिक ४००६ हेक्टरचे नुकसान झाले आहे. धामणगाव रेल्वे ६००, भातकुली ८००, अचलपूर ३८०, अंजनगाव २००, दर्यापूर ५००, धारणी १७, चिखलदरा १२, मोर्शी ९११, वरुड ८, चांदूर बाजार ४०० व तिवसा तालुक्यात ४५ हेक्टरमधील पिकांचे पुरामुळे नुकसान झाले आहे.३० दिवसांत मिळणार भरपाईविमा कंपनीद्वारा माहिती प्राप्त झाल्याच्या ४८ तासांत नुकसानीचे मूल्यांकन निश्चित करण्यासाठी पर्यवेक्षकाची नियुक्त करण्यात येईल व पुढील १० दिवसांत नुकसानीचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. जर बाधित क्षेत्र हे अधिसूचित विमा क्षेत्राच्या २५ टक्केपर्यंत असेल तर वैयक्तिक स्तरावर पात्र शेतकऱ्यांचे नुकसान ठरविण्यात येणार आहे. जर हे क्षेत्र विमा संरक्षित क्षेत्राच्या २५ टक्के पेक्षा जास्त असेल तर या क्षेत्रातील सर्व पात्र शेतकरी हे काढणी पश्चात नुकसान भरपाई मिळण्यास पात्र राहणार आहे.