उच्चदाब वितरण प्रणाली योजनेचा विदर्भ, मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:13 AM2021-09-19T04:13:21+5:302021-09-19T04:13:21+5:30

अमरावती / संदीप मानकर उच्चदाब वितरण प्रणाली योजनेचा सुधारित खर्च ५०४८.१३ कोटींवरून ४७३४.६१ कोटी इतका करण्यास शासनाने १५ सप्टेंबर ...

Benefit to farmers of Vidarbha, Marathwada division of high pressure distribution system scheme | उच्चदाब वितरण प्रणाली योजनेचा विदर्भ, मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांना लाभ

उच्चदाब वितरण प्रणाली योजनेचा विदर्भ, मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांना लाभ

Next

अमरावती / संदीप मानकर

उच्चदाब वितरण प्रणाली योजनेचा सुधारित खर्च ५०४८.१३ कोटींवरून ४७३४.६१ कोटी इतका करण्यास शासनाने १५ सप्टेंबर रोजी मान्यता दिली आहे. या योजनेला आता ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदत राहणार आहे. उच्चदाब वितरण प्रणाली योजनेच्या सुधारित प्रकल्प किमतीस तसेच योजनेस शासनाने मुदतवाढ दिल्याने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

वितरण प्रणाली अंतर्गत ३१ मार्च २०१८ अखेर वीज जोडण्याकरिता प्रलंबित कृषिपंप अर्जदारांना वीजजोडण्या देण्याकरिता योजनेची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. विदर्भ व मराठवाडा विभागांतील सर्वसाधारण प्रवर्गातील मार्च २०१८ अखेर प्रलंबित कृषिपंप ऊर्जाकरणाकरिता लागणाऱ्या अनुदानात लेखाशीर्षानुसार ७८०.७३ कोटींची वाढ झाली असल्याने या वाढीव खर्चास मंजुरी देण्यात येत आहे. महावितरण कंपनीकडे उच्चदाब वितरण प्रणाली योजनेंतर्गत आदिवासी विकास विभागाच्या शिल्लक अनुदान व उर्वरित वीज जोडण्या देण्याकरिता लागणारे अतिरिक्त अनुदान उर्वरित राज्यातील विदर्भ व मराठवाडा विभाग वगळून ३१ मार्च २०१८ अखेर पैसे भरून वीज जोडणीकरिता प्रलंबित अनुसूचित जमाती वर्गवारीतील कृषिपंप अर्जदारांना वीजजोडणी देण्याकरिता प्राधान्याने खर्च करण्याबाबत मान्यता दिली. तसेच कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० अंतर्गत धोरण कालावधीत १ एप्रिल २०१८ नंतरच्या वीजजोडणीकरिता प्रलंबित असणाऱ्या राज्यातील अनुसूचित जमाती वर्गवारीतील कृषिपंप अर्जदारांना वीजजोडणी देण्याकरिता या योजनेतून खर्च करण्याबाबतही मान्यता दिली.

Web Title: Benefit to farmers of Vidarbha, Marathwada division of high pressure distribution system scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.