जन-धन योजनेचे लाभार्थी संभ्रमात
By Admin | Updated: August 31, 2014 23:30 IST2014-08-31T23:30:14+5:302014-08-31T23:30:14+5:30
मोदी सरकारने आर्थिक अस्पृश्यता संपविण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या जन-धन योजनेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम दिसून येत आहे. गोरगरीब जनतेकरिता सुरु केलेल्या या योजनेत नागरिाकांना बँक

जन-धन योजनेचे लाभार्थी संभ्रमात
बँकेचा ताण वाढला : नागरिकांना मार्गदर्शनाची आवश्यकता
अमरावती : मोदी सरकारने आर्थिक अस्पृश्यता संपविण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या जन-धन योजनेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम दिसून येत आहे. गोरगरीब जनतेकरिता सुरु केलेल्या या योजनेत नागरिाकांना बँक खाते काढण्याकरिता मार्गदर्शनाची आवश्यकता भासत असल्याचे दिसून येत आहे. योजना सुरु झाल्यापासून नागरिकांनी बॅकांमध्ये गर्दी केल्याने बँक कर्मचाऱ्यांचा ताण वाढला आहे.
१५ आॅगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक कुटुंबाचे बँक खाते या संकल्पनेची घोषणा केली. त्या अनुषंगाने जन-धन योजनेला प्रारंभ झाला. देशभरात जन-धन योजनेंतर्गत बॅक खाते उघडण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. मात्र या योजनेमध्ये अधिकाअधिक बँक खातेदार गरीब आहेत. काहींना बँकेच्या व्यवहाराची माहिती नाही, ही योजना समजावून घेण्याकरिता नागरिक बँकेत धाव घेत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाच मनस्ताप होत आहे. ही योजना राबविली जात आहे. मात्र त्याकरिता नागरिकांना बँक खाते उघडण्याकरिता मार्गदर्शन करणाऱ्याचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिक संभ्रमात पडले आहे. तसेच या योजनेमध्ये गोरगरीब नागरिकांंचे बँक खाते उघडण्यात येत आहे. मात्र यामध्ये ज्यांचे बँक खाते आधीच आहेत काही मध्यमवर्गीय तसेच श्रीमंत नागरिकसुध्दा योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन बँक खाते उघडत असल्याचे आढळून येत आहेत. या योजनेबाबत प्रशासन स्तरावर माहिती देणारी यंत्रणा हवी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.