कुऱ्हा येथे ‘प्रशासनाची वारी घरकुल मंजुरीसाठी लाभार्थींच्या दारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:12 IST2021-03-24T04:12:25+5:302021-03-24T04:12:25+5:30

कुऱ्हा : आवास अभियान २०२० च्या अंमलबजावणीसाठी ‘प्रशासनाची वारी घरकुल मंजुरीसाठी लाभार्थींच्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ...

Beneficiaries' Doors for Home Approval at Kurha | कुऱ्हा येथे ‘प्रशासनाची वारी घरकुल मंजुरीसाठी लाभार्थींच्या दारी’

कुऱ्हा येथे ‘प्रशासनाची वारी घरकुल मंजुरीसाठी लाभार्थींच्या दारी’

कुऱ्हा : आवास अभियान २०२० च्या अंमलबजावणीसाठी ‘प्रशासनाची वारी घरकुल मंजुरीसाठी लाभार्थींच्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे व तिवसा येथील गटविकास अधिकारी चेतन जाधव सोमवारी कुऱ्हा गावात पोहोचले.

सरपंच मीना नायर, तिवसा पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, केंद्रप्रमुख तथा विस्तार अधिकारी अनिल खाकसे, हरी पटेल, कुऱ्हा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रदीप भटकर, रोजगार सेवक सुरेश सपाटे यांनी लाभार्थींच्या घरी जाऊन घरकुल बांधकामाबाबत समुपदेशन केले. लाभार्थींच्या प्रस्तावात अनेक त्रुटी आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर थेट अधिकारीच ग्रामस्थांच्या घरी पोहोचले.

------------------------

Web Title: Beneficiaries' Doors for Home Approval at Kurha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.