शिक्षणविरोधी सरकारला उखडून फेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 22:00 IST2018-02-05T21:59:47+5:302018-02-05T22:00:32+5:30
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. हे सरकार शिक्षणाविरोधात आहे, अशी टीका आ. यशोमती ठाकूर यांनी केली.

शिक्षणविरोधी सरकारला उखडून फेका
आॅनलाईन लोकमत
तिवसा : कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. हे सरकार शिक्षणाविरोधात आहे, अशी टीका आ. यशोमती ठाकूर यांनी केली.
तिवसा तालुक्यातील गुरुकुंजात जिल्हास्तरीय शालेय क्रीडा महोत्सवाचे ५ फेब्रुवारी रोजी दुपारी थाटात उद्घाटन झाले. यावेळी आ. ठाकूर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाणे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, शिक्षण सभापती जयंत देशमुख, वित्त सभापती बळवंत वानखडे, सदस्य गौरी देशमुख, वनिता पाल, पं.स. सभापती अर्चना वेरूळकर, लोकेश केने, अभिजित बोके, पूजा आमले, पूजा येवले, श्याम मसराम, अनिल डबरासे, राजेंद्र पाटील, राजेंद्र बहुरूपी, अलका देशमुख, शिल्पा भलावी, वैशाली बोरकर, मंगेश भगोले, उज्ज्वला पांडव, रंजना पोजगे, गुरुदेवनगरचे सरपंच पांडुरंग मक्रमपुरे, रघुनाथ वाडेकर, प्रकाश मक्रमपुरे आदी उपस्थित होते संचालन अजय अडिकने व प्रास्ताविक शिक्षणाधिकारी रामभाऊ तुरणकर यांनी केले.
आयोजनासाठी यशोमती ठाकूर यांचे प्रयत्न
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन पहिल्यांदाच तिवसा तालुक्यात गुरुकुंज मोझरी येथे आ. यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे पार पडला. राष्ट्रसंतांच्या कर्मभूमीत व तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवातील सभामंडपात हा सोहळा पार पडतोय. जि.प. शिक्षण व बांधकाम सभापती जयंतराव देशमुख यांनी आयोजनाचे कौतुक केले.