जलप्रकल्पांचे पोट भरले
By Admin | Updated: August 6, 2016 00:02 IST2016-08-06T00:02:22+5:302016-08-06T00:02:22+5:30
जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस व धरणक्षेत्रात जोरदार पाऊस तसेच मध्यप्रदेशातील अतिवृष्टीने प्रकल्पात वाढती ...

जलप्रकल्पांचे पोट भरले
८०.७८ टक्के साठा : उर्ध्व वर्धा, चंद्रभागा, पूर्णा, सपन प्रकल्पाचे एकूण १८ गेट उघडले
अमरावती : जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस व धरणक्षेत्रात जोरदार पाऊस तसेच मध्यप्रदेशातील अतिवृष्टीने प्रकल्पात वाढती आवक यामुळे जिल्हा प्रमुख, मध्यम व लघु अशा एकूण ८२ प्रकल्पाचे साठवण क्षमतेच्या ८०.७८ टक्के साठा आहे. धरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ४ धरणांची दरवाजे उघडण्यात आलेली आहे. यामुळे नदी-नाले प्रभाविक होऊ शकतात. यासाठी खोलगट भागात राहणाऱ्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात एकमेव मुख्य प्रकल्प असणाऱ्या उर्ध्य वर्धा धरणात सध्या प्रकल्पीय संकल्पीय ५६४.०५ दलघमी साठयाच्या तुलनेत सध्या ३४१.५८ दलघमीसाठा शिल्लक आहे. ही ८५.७५ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच तारखेत ४११.९४ दलघमी साठा शिल्लक होता ही ७३.०३ टक्केवारी होती.
जिल्ह्यात ४ मध्यम प्रकल्पात आहे. यामध्ये शहानूर प्रकल्पात संकल्पपीय ४६.०४ दलघमी साठयाच्या तुलनेत ४३.१९ दलघमीसाठा शिल्लक आहे. ही ७४.२६ टक्केवारी आहे. मागील वर्षी आज तारखेत या धरणात ३६.७६ दलघमी साठा होता. व ही ७९.८४ टक्केवारी होती.
चंद्रभागा प्रकल्पात सध्यास्थितीत ४६.०४ दलघमी साठयाच्या तुलनेत ३४.१९ दलघमी साठा आहे. ७४.२६ टक्केवारी आहे. मागील वर्षीयाच दिनांकाला ७९.८४ टक्के साठा होता. पुर्णा प्रकल्पात सध्या ३५.३७ दलघमी संकल्पीय साठयाच्या तूलनेत सध्या ३०.६१ जलसाठा आहे ही ७४.२१ टक्केवारी आहे. मागील वर्षी आजच्या दिनांकाला ७०.१६ टक्के साठा होता. सपन प्रकल्पात संकल्पीय ३९.६० दलघमी साठयाच्या तुलनेत २७.१५ दलघमी साठा आहे ही ७०.३४ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच दिनांकाला ७०.३४ टक्के साठा होता. जिल्ह्यात एकूण ७७ लघुप्रकल्प आहे. यामध्ये प्रकल्पीय संकल्पीय १७९.८४ दलघमी साठयाच्या तुलनेत सध्या १३४.२८ दलघमी साठा आहे. ही ७४.६७ टक्केवारी आहे. मागील वर्शी याच दिनांकाला ६८.३४ दलघमी साठा होता. ही ३८ टक्केवारी होती. या सर्व प्रकल्पात एकूण ९०५.१५ दलघमी जलसाठयाच्या तुलनेत सद्यास्थितीत ७३१.१९ दलघमी साठा आहे की, ८०.७८ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच दिनांकाला ५९४.५८ दलघमी साठा होता ही ६५.६९ टक्केवारी होती.
गेल्या २४ तासात जिल्हत ६.६ मिमी पाऊस पउला सर्वाधिक २०.४ मिमी पाऊस चिखलदऱ्यात पउला. १ जून ते ४ आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात ४५७.९ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असतांना ६९३.९ मिमी पाऊस पडला ही १५१.५ टक्केवारी आहे. वार्षिक सरासरीच्या ८५.२ टक्के हा पाऊस पडला आहे. (प्रतिनिधी)