शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
3
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
4
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
5
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
6
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
7
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
8
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
9
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
10
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
11
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
12
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
13
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
14
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
15
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
16
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
17
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
18
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
19
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
20
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार

बेलकुंडचे विश्रामगृह मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरित

By admin | Updated: April 24, 2017 00:46 IST

उच्च न्यायालयाने फटकारल्यावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील ऐतिहासिक असे बेलकुंडचे विश्रामगृह अखेर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरित करण्याचा ....

उच्च न्यायालयाने फटकारले : निसर्ग संरक्षण संस्थेच्या याचिकेचे यशअमरावती : उच्च न्यायालयाने फटकारल्यावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील ऐतिहासिक असे बेलकुंडचे विश्रामगृह अखेर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय १९ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला आहे. निसर्ग संरक्षण संस्थेने महाराष्ट्रातील संरक्षित वनक्षेत्रांबाबत एक याचिका (क्रमांक ३९६०/२००६) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल केली होती. यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान या अतिसंरक्षित (गाभा क्षेत्र) क्षेत्रातील (कोअर एरिया) बेलकुंड विश्रामगृहाच्या ताब्याबद्दलचा मुद्दा उचलण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार हे विश्रामगृह मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरीत करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला गेल्या वर्षीच दिले होते. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत टोलावा टोलवी सुरू ठेवली. न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असताना २०१६ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने काहीही पावले उचलले नाही. हा मुद्दा २०१७ मध्ये पुन्हा न्यायालयात चर्चेस आला असताना याप्रकरणी होत असलेली दिरंगाई लक्षात घेऊन १६ जानेवारी २०१७ रोजी न्यायालयाने विश्रामगृहाच्या हस्तांतरणाचे स्पष्ट आदेश दिलेत. यावर ए.व्ही. व्यास, सहाय्यक मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग यांनी पुन्हा १४ फेब्रुवारी २०१७ रोजी मंत्रालयातील कार्यासन अधिकाऱ्यास परवानगी मागण्याचे कागदी घोडे चालविले. यावर मागील तब्बल दोन महिने मंत्रालय गप्प राहिले. मागील आठवड्यात न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी याचिकाकर्ते निसर्ग संरक्षण संस्थेच्यावतीने अधिकाऱ्यांची ही टाळाटाळ न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. यावर न्यायालयाने एक महिन्याच्या आत हे विश्रामगृह हस्तांतरित न झाल्यास न्यायालयाची अवमानना झाल्याबद्दल कारवाई करण्यात येईल, असे स्पष्टपण सांगितले. न्यायालयाच्या दणक्यानंतर अखेर शासनाने १९ एप्रिल रोजी शासन निर्णय काढून हे विश्रामगृह तडकाफडकी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय जाहीर केला. (प्रतिनिधी)विश्रामगृहाचा इतिहास मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान या अतिसंरक्षित (गाभा क्षेत्र) क्षेत्रातून जाणाऱ्या हरिसाल ते अकोट या रस्त्यावर बेलकुंड विश्रामगृह वसले आहे. ब्रिटिशांनी १८९१ मध्ये वनजमिनीवर हे विश्रामगृह बांधले होते. ब्रिटिश अधिकारी हे विश्रामगृह डाकबंगला म्हणून वापरायचे व या अत्यंत दुर्गम भागात रस्त्याचे जाळे उभारताना या विश्रामगृहाचा विश्रांती करण्याकरिता वापर करीत. सुरुवातीला दगडी भिंती व वरुन गवताचे छत असे या विश्रामगृहाचे स्वरुप होते. नंतरच्या काळात यावर इंग्रजी कवेलू व व्हरांड्यात लोखंडी ग्रील लावण्यात आलञया. विश्रामगृहाच्या बाजूनेच एक नदी वाहते. या नदीवर ब्रिटिशकालीन स्थापत्य शास्त्राचा नमुना ठरलेला १८८६ साली बांधलेला एक पुरातन पूल आहे. १३१ वर्षापूर्वी बांधलेला हा पूल आजही सुस्थितीत आहे. या बेलकुंड पुलावर एक लोखंडी फळी लावली आहे. त्यावर १८८६ आर. डब्ल्यू. स्वीनरटॉम इएसक्यू एमीक इंजिनिअर बाबू देवनाथ साहाई वोरशिर या पूल बनविणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. स्वातंत्र्यानंतर विश्रामगृह बांधकाम विभागाच्या ताब्यात स्वातंत्र्यानंतर बेलकुंडचे हे टुमदार विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर यांच्या पी.आर.बी. वहीमध्ये या विश्रामगृहाची नोंद असून ते ०.६० एकर एवढ्या जागेवर पसरले आहे. २००७ मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संवेदनशील व्याघ्र अधिवास (क्रिटीकल टायगर हेबिटेट)ची अधिसूचना निघाल्यानंतर या कोअर क्षेत्रात वन्यजीव कायद्यानुसार वनेतर कामे, किंवा अशा कामासाठी इतर विभागांनी उभारलेल्या वस्तू यावरील इतर सर्व अधिकार संपुष्टात आले. त्यातच खानसामा, चौकीदार आणि कक्ष सेवक ही पदे रिक्त असल्याने या हे विश्रामगृह गेल्या काही वर्षांपासून अगगळीत पडले होते. त्यामुळे या विश्रामगृहाची दारे, खिडक्या तोडली गेली व छतालासुद्धा भोके पडली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रात असल्याने येथे पर्यटकांना येण्यास मनाई आहे, तरीही या विश्रामगृहाची शासनाच्या अनास्थेमुळे अशी दुर्दशा झाली. शासन निर्णयानुसार येत्या काही दिवसात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरित होताच मेळघाटच्या ब्रिटिशकालीन इतिहासाचे साक्षीदार राहिलेल्या या विश्रामगृहाचा कायापालट होईल, अशी अपेक्षा आहे, असे मत याचिकाकर्ते वन्यजीव प्रेमी किशोर रिठे यांनी व्यक्त केली आहे.