बेलोर्‍याची विमान धावपट्टी १५ दिवसांत होणार सज्ज

By Admin | Updated: May 10, 2014 23:55 IST2014-05-10T23:55:21+5:302014-05-10T23:55:21+5:30

बेलोरा विमानतळाच्या धावपट्टीतील तांत्रिक दोषांमुळे येथे विमान उतरविणे धोक्याचे झाले असून या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम युध्दस्तरावर सुरु आहे.

Belaravi's aircraft will be ready to be runway in 15 days | बेलोर्‍याची विमान धावपट्टी १५ दिवसांत होणार सज्ज

बेलोर्‍याची विमान धावपट्टी १५ दिवसांत होणार सज्ज

बडनेरा : बेलोरा विमानतळाच्या धावपट्टीतील तांत्रिक दोषांमुळे येथे विमान उतरविणे धोक्याचे झाले असून या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम युध्दस्तरावर सुरु आहे. पंधरवाड्यात ही धावपट्टी ‘लँडिंग’साठी सज्ज होणार आहे. गतवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बेलोरा विमानतळाची धावपट्टी ठिकठिकाणी उखडली होती. ‘लोकमत’ने या वृत्ताची दखल घेतली. बेलोरा विमानतळाचे व्यवस्थापक पाठक यांनी या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सोपविला. प्रशासनाने हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठविला. त्याची शहानिशा झाल्यानंतर बेलोरा विमानतळाच्या धावपट्टीच्या नूतनीकरणाची मंजुरी संबंधित प्रशासनाला प्राप्त झाली. त्यानुसार बेलोरा विमानतळाच्या १३७२ मीटर लांबीच्या धावपट्टीच्या नूतनीकरणाचे काम जलदगतीने सुरु आहे. काम झाल्यानंतर १५० मीटर टॅक्सीच्या व २०० मीटर हेलिपॅडच्या कामाला हात लावण्यात येईल. धावपट्टीचे काम दर्जेदार व्हावे, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. अधिकार्‍यांच्या तत्परतेने विमान धावपट्टीचे काम गतीने सुरू आहे.

Web Title: Belaravi's aircraft will be ready to be runway in 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.