जिल्ह्यात रबीच्या पेरणीला सुरुवात

By Admin | Updated: October 16, 2015 00:46 IST2015-10-16T00:46:38+5:302015-10-16T00:46:38+5:30

जिल्ह्यात रबी हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. यंदा रबीसाठी १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे.

Beginning of rabi sowing in the district | जिल्ह्यात रबीच्या पेरणीला सुरुवात

जिल्ह्यात रबीच्या पेरणीला सुरुवात

गहू निरंक : १७५१ हेक्टरमध्ये हरभरा पेरणी
अमरावती : जिल्ह्यात रबी हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. यंदा रबीसाठी १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. यापैकी १ हजार ७५१ हेक्टर क्षेत्रात १४ आॅक्टोबरपर्यंत हरभऱ्याची पेरणी झाली आहे. अन्य कुठल्याही पिकाची पेरणी झालेली नाही.
यंदा पेरणीपासून पावसाची दडी असल्याने खरीपाचा हंगाम माघारला होतो. त्यामुळे सोयाबीनची शेत ही उशिराने खाली होत आहे. रबीपूर्व मशागतीनंतर या आठवड्यात रबीच्या पेरणीला सुरुवात झाली. तीन दिवसांत जिल्ह्यात १ हजार ७५१ हेक्टर क्षेत्रात हरभरा पिकाची पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक ५०० हेक्टरची पेरणी तिवसा तालुक्यात झालेली आहे.
जिल्ह्यात रबीसाठी १ लाख ४७ हजार ९५० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. यामध्ये धारणी तालुक्यात १४ हजार १४० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. चिखलदरा ३ हजार १४० हेक्टर, अमरावती ८ हजार ५०० हेक्टर, भातकुली १८ हजार ४८० हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ६ हजार ५५० हेक्टर, चांदूररेल्वे ५ हजार ७३०, तिवसा ७ हजार ४४० हेक्टर, मोर्शी ८ हजार ७६० हेक्टर, वरुड ६ हजार ९३० हेक्टर, दर्यापूर २५ हजार ६५० हेक्टर, अंजनगाव सुर्जी १८ हजार ७७० हेक्टर, अचलपूर ९ हजार २५० हेक्टर, चांदूरबाजार ७ हजार ६५० हेक्टर व धामणगाव रेल्वे तालुक्यात ६ हजार ९०० हेक्टर रबीसाठी प्रस्तावित आहे.

Web Title: Beginning of rabi sowing in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.