मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजार’ला सुरुवात
By Admin | Updated: November 14, 2015 00:22 IST2015-11-14T00:22:51+5:302015-11-14T00:22:51+5:30
दिवाळी सण संपताच मेळघाटातील आदिवासी बांधवांचा शुक्रवारी धारणीचा आठवडी शुक्रवारपासून प्रारंभ झाला.

मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजार’ला सुरुवात
आठवडाभर चालणार महोत्सव : आदिवासींच्या गर्दीने बाजार फुलले
श्यामकांत पाण्डेय धारणी
दिवाळी सण संपताच मेळघाटातील आदिवासी बांधवांचा शुक्रवारी धारणीचा आठवडी शुक्रवारपासून प्रारंभ झाला. गुरुवारी गावात पाडवा उत्सव साजरा केल्यानंतर घुंगरू बाजाराला सुरुवात झाली. धारणी पाठोपाठ शनिवारी कळमखार, रविवारी चाकर्दा, सोमवारी बिजुधावडी आणि वैरागड, मंगळवारी टिटंबा, बुधवारी हरिसाल आणि सुसर्दा येथे घुंगरू बाजाराची धूम राहणार आहे.
मेळघाटातील आदिवासी बांधवांमधील गोड या पशुपालक समाजाचा या घुंगरू बाजारात विशेष महत्त्व आहे. या समाजाला मेळघाटात ठाय्या असे म्हणत असल्याने बाजाराला ठाय्य बाजारसुध्दा म्हटला जातो. या समाजातील पुरुष मंडळी विशेष पोषाखात घुंगरू बाजारात येतात. पांढरा सदरा, पांढरी धोती, काळा कोट, डोक्यावर काळा चष्मा, हाता काठी, बांसरी आणि डोक्यावर तुरेदार पगडी हा विशेष आकर्षण ठरतो. त्याचेसोबत ढोल, टिमका, आणि बासुरीसह म्हशीचा सिंगाचा वाजणारी पुंगी व सर्वांनी मिळून लयबध्द केलेले गोंडी नृत्य शुक्रवारी शहरवासीयांना पहावयास मिळाला.
शुक्रवारी शहर परिसरातील जवळपास १०० गावातील आदिवासी बांधवांची हजेरी होती. गोंडी नृत्य करताना त्यांच्यात दोन लोकांजवळ कापडाची झोळी घेऊन बक्षीस मागणारे असतात. वर्षभर जनवारे चारल्यामुळे वर्षातून एकदा आपला हक्काने बक्षिसांचा स्वीकार करतात. यात रोख रकमेसह जे काही दुकानातील सामान दिले जाते, त्याचा स्वीकार प्रेमाने केला जातो. पुढील आठ दिवस घुंगरू बाजाराचा आनंदोत्सव पहावयास मिळणार आहे.