पांढरा पुलावरील पाईपलाईन काढण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:13 IST2021-04-08T04:13:08+5:302021-04-08T04:13:08+5:30
लोकमत इम्पॅक्ट नरेंद्र जावरे परतवाडा : शहरातील पांढरा पुलावरून टाकलेली पाईपलाईन काढण्याचे काम सुरू झाले असून, त्यानंतरच या पूल ...

पांढरा पुलावरील पाईपलाईन काढण्यास सुरुवात
लोकमत इम्पॅक्ट
नरेंद्र जावरे परतवाडा : शहरातील पांढरा पुलावरून टाकलेली पाईपलाईन काढण्याचे काम सुरू झाले असून, त्यानंतरच या पूल निर्मितीचे काम होणार आहे. यासंदर्भात लोकमत ते वृत्त प्रकाशित केले होते. पाईपलाईन काढताना तेथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले.
बैतूल ते अकोट रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्यात परतवाडा शहरातूनसुद्धा सिमेंट काँक्रीट रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. चिखलदरा स्टॉपवरील पांढरा पूल निर्मितीच्या कामांना संबंधित कंट्रक्शन कंपनीला सुरुवात करायची होती. परंतु, अचलपूर नगरपालिकेने जुळ्या शहरासाठी चंद्रभागा प्रकल्पावरून टाकलेली पाणीपुरवठा मुख्य पाईपलाईन थेट पुलावरून असल्याने ती तोडल्यास नागरिकांचा पाणीपुरवठा खंडित होईल. त्यामुळे पूल निर्मितीचे काम वर्षभरापासून संबंधित कंपनीला करता आले नाही. पाणीपुरवठाची पाईपलाईन काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने वारंवार पत्र देऊनसुद्धा पालिका प्रशासन कुठलीच कारवाई करीत नसल्याचे चित्र होते. पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे मोठ्या अपघाताची भीती व्यक्त होत होती. अखेर लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर पालिकेने सदर कामाच्या निविदा काढल्या. त्यानंतर कामाला सुरुवात झाली आहे.
बॉक्स
वाहतूक कोंडी, पोलीस तैनात
परतवाडा शहरातून जाणारा मार्ग याच पांढरा पुलावरून असल्याने सर्वाधिक वाहतुकीचा व रहदारीचा हा पूल आहे. चंद्रभागा प्रकल्पावरून येणाऱ्या जुळ्या शहराच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन खालून न टाकता पुलावरून टाकण्यात। आली होती. ही पाईपलाईन काढल्यानंतरच संबंधित नवीन पुलाचे बांधकाम होणार आहे. पाईपलाईन काढताना मध्यप्रदेश, अकोला, चिखलदरा व शहरात ये-जा करण्यासाठी वाहनांची कोंडी पाहता येथे वाहतूक पोलीस तैनात करण्यात आली आहे.
कोट
पांढरा पुलावरील पाईपलाईन काढण्याचे काम संबंधित कंत्राटदारामार्फत आरामात सुरू करण्यात आले आहे. शहराला होणारा पाणीपुरवठा दुसऱ्या ठिकाणावरून जोडणी केला जात आहे.
- मिलिंद वानखडे,
आरोग्य व स्वच्छता निरीक्षक
अचलपूर नगर पालिका
------------