शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रेस्क्यू पथकावर मधमाशांचा हल्ला; एक गंभीर पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:22 IST

येथील प्रसिद्ध भीमकुंड पॉइंटच्या दोन हजार फूट खोल दरीत मंगळवारी सकाळी ९.३० वाजता एका दाम्पत्याने उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांचे मृतदेह काढण्यासाठी दरीत उतरलेल्या पथकावर मधमाशांनी जोरदार हल्ला केला.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : येथील प्रसिद्ध भीमकुंड पॉइंटच्या दोन हजार फूट खोल दरीत मंगळवारी सकाळी ९.३० वाजता एका दाम्पत्याने उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांचे मृतदेह काढण्यासाठी दरीत उतरलेल्या पथकावर मधमाशांनी जोरदार हल्ला केला. त्यात एक जण गंभीर, तर पाच किरकोळ जखमी झाले. त्यांना रात्री दीड वाजता दुसऱ्या पथकाने दरीत उतरून बाहेर काढले.मधमाशांच्या दंशाने दिलीप सावलकर (२५) हे गंभीर जखमी झाले असून, किरण कासदेकर (३०), मयूर सावलकर (२९), नितीन गुडियाला (३२), रामा धिकार (३०) व सुनील सावलकर (२२) अशी जखमींची नावे आहेत. नजीकच्या शहापूर येथील गणेश झगुजी हेकडे व राधा हेकडे या दाम्पत्याने कौटुंबिक कलहातून मंगळवारी सकाळी ९.३० च्या सुमारास भीमकुंड दरीत आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह काढण्यासाठी काही युवकांना पाठविण्यात आले होते. या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात आग्यामोह आहे.मृतदेहापर्यंत काही युवक पोहोचले. दरीच्या वरच्या भागातून नेहमीप्रमाणे दोरखंड सोडण्यात आला. मात्र, अचानक मधमाशा चवताळल्या. त्यांनी मृतदेह काढण्यासाठी गेलेल्या पथकाला चावा घ्यायला सुरुवात केली. त्यातील काही जण जंगलात सैरावैरा पळत सुटले, तर दिलीप सावलकर याला मधमाशांनी मोठ्या प्रमाणात दंश केल्याने तो बेशुद्ध अवस्थेत तेथून पडून राहिला.पोलिसांची रेस्क्यू टीम फेलअमरावती येथील पोलिसांच्या रेस्क्यू टीममधील बाबूलाल पटेल, उईके मेजर आदी कर्मचाऱ्यांचे पथक गुरुवारी दरीत उतरले होते. या पथकाने विशेष परिधान केले होते. तरीसुद्धा मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे हे पथकसुद्धा गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दरीतून मृतदेहाविना परतले. आता घटनेच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी नागपूर किंवा इतर विशेष पथकाला पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती चिखलदरा पोलिसांनी दिली.रात्री दीड वाजता काढले दरीबाहेरदोन हजार फूट खोल दरीत पाच ते सहा जणांना जावे लागते. मधमाशांनी पथकावर हल्ला केल्यानंतर सैरावैरा पळत सुटलेले काही जण परत खोऱ्यातून वर आले. मात्र, दिलीप गंभीर जखमी झाल्याने तो जागेवरच बेशुद्ध अवस्थेत पडून होता. रात्री ठाणेदार आकाश शिंदे व नगरसेवक अरुण तायडे यांनी इतर गावकरी व सहकाऱ्याच्या मदतीने इमर्जन्सी लाइट लावून सर्च आॅपरेशन राबविले व रात्री दीड वाजता आठ जणांच्या चमूने जाऊन खोऱ्यात अडकलेल्या दिलीपसह अन्य काहींना बाहेर काढले. त्यांच्यावर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली.मृतदेहाचे गाठोडे बांधूनचस्थानिक रहिवाशांच्या पथकाने बुधवारी दोन्ही मृतदेह एका पोत्यात बांधून ठेवले होते. दोरखंडाच्या साह्याने वर ओढण्यापूर्वी त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. दुसरीकडे मोथा व शहापूर येथील नातेवाइकांना मृतदेहाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस