अचलपुरातून गोमांस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST2021-07-07T04:15:40+5:302021-07-07T04:15:40+5:30
परतवाडा : अचलपूर पोलिसांनी फरमानपुरा येथे एका घरात गोवंश मांस विक्री करणाऱ्याला मुद्देमालासह मंगळवारी अटक करण्यात आली. ...

अचलपुरातून गोमांस जप्त
परतवाडा : अचलपूर पोलिसांनी फरमानपुरा येथे एका घरात गोवंश मांस विक्री करणाऱ्याला मुद्देमालासह मंगळवारी अटक करण्यात आली.
सै. रज्जाक सै. कदीर (३६, रा. फरमानपुरा, अचलपूर) अशी आरोपींची नाव आहे. तो घरातून गोमांस विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून तपासणी केली असता, २५ किलो गोमांस व तीन हजार सातशे रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. त्याच्याविरुद्ध ठाणेदार सेवानंद वानखेडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कलम ५, ५ (ब) (क), ९, ९ (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५/२०१५ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पंकज तायडे व कर्मचारी करीत आहेत.