चांदूर बाजारात गोवंशासह गोमांस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:12 IST2021-03-14T04:12:56+5:302021-03-14T04:12:56+5:30

फोटो पी १३ चांदूरबाजार चांदूर बाजार : स्थानिक कसाबपुरा येथे गुप्त माहितीच्या आधारे चांदूरबाजार पोलिसांनी एका गाईसह गोमांस जप्त ...

Beef with beef seized in Chandur market | चांदूर बाजारात गोवंशासह गोमांस जप्त

चांदूर बाजारात गोवंशासह गोमांस जप्त

फोटो पी १३ चांदूरबाजार

चांदूर बाजार : स्थानिक कसाबपुरा येथे गुप्त माहितीच्या आधारे चांदूरबाजार पोलिसांनी एका गाईसह गोमांस जप्त केले. या कारवाईत ३७ हजार २७० रुपयांचा मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

शुक्रवारी सकाळी ९ दरम्यान पोलिसांनी ठाणेदार सुनील किनगे यांच्या नेतृत्वात पोलीस जमादार वीरेंद्र अमृतकर, प्रशांत भटकर, महिला पोलीस जमादार शुभांगी काळे यांच्या पथकाने कसाबपुरा येथील नाल्याच्या भागात धाड टाकली. या छाप्यात पोलिसांना घटनास्थळावर गोवंश मांस, पाय, सिंग, मुंडके वजन १ क्विंटल ७ किलो किंमत अंदाजे १७ हजार १२० रुपये, तसेच ३० हजार रुपये किमतीची गाय, सोबतच कु-हाड, चाकू असा एकूण ३७ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी अ. शकूर कुरेशी शेख इस्माईल (३६, रा. ताजनगर, चांदूरबाजार) याला अटक करण्यात आली. त्याचेविरूद्ध भादंविचे कलम ४२९ भादंवि, कलम ५, ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Beef with beef seized in Chandur market