भगतसिंग बाल उद्यानाचे सुशाेभीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:14 IST2021-03-18T04:14:06+5:302021-03-18T04:14:06+5:30
एआयएसएफ, भगतसिंग युथ फोरमची मागणी, महापालिका आयुक्तांना निवदेन अमरावती : येथील टोपे नगर परिसरात मांगीलाल प्लॉटमध्ये शहीद भगतसिंग बालोद्यानाचे ...

भगतसिंग बाल उद्यानाचे सुशाेभीकरण करा
एआयएसएफ, भगतसिंग युथ फोरमची मागणी, महापालिका आयुक्तांना निवदेन
अमरावती : येथील टोपे नगर परिसरात मांगीलाल प्लॉटमध्ये शहीद भगतसिंग बालोद्यानाचे सुशाेभीकरण करावे, अशी मागणी एआयएसएफ, भगतसिंग युथ फोरमने केली आहे. महापालिका आयुक्त हेमंत रोडे यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनानुसार, मैदानाचे कंपाऊंड सुरक्षित आहे. पण, मैदानात मागील बाजूला तुटलेले बेंच, आजूबाजूला लोखंडी साहित्य पडलेले असून, त्या उद्यानात शहीद भगतसिंग यांच्या नावाचा ना फलक, ना कोनशिला. या उद्यानाचा शिलान्यास २३ मार्च १९७३ रोजी भगतसिंग यांचे बंधू सरदार कुलबिरसिंग यांच्या हस्ते करण्यात आला होता.
२३ मार्च रोजी भगतसिंग यांचा स्मृतिदिन आहे. त्या निमित्ताने उद्यानाचे सुशोभिकरण करून त्यांच्या कार्याचा गौरव करावा, अशी मागणी एआयएसएफ, भगतसिंग युथ फोरमच्यावतीने योगेश चव्हाण, विजय भारती, कार्तिक पुरी, मयूर राठोड, किरण राठोड आदींनी केली आहे.