क्षुल्लक कारणावरून युवकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST2021-07-22T04:09:39+5:302021-07-22T04:09:39+5:30
-------------- दर्यापुरात महिलेची पोत पळविली दर्यापूर : सुमन रंगराव मंडवे या मूर्तिजापूर मार्गावरील गजनना महाराज मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. ...

क्षुल्लक कारणावरून युवकाला मारहाण
--------------
दर्यापुरात महिलेची पोत पळविली
दर्यापूर : सुमन रंगराव मंडवे या मूर्तिजापूर मार्गावरील गजनना महाराज मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. तेथून बाहेर पडताना गळ्याला हात लावला तेव्हा ४.१३० ग्रॅम वजनाची पोत नसल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध दर्यापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
----------------
वहितीकरिता ट्रॅक्टर न दिल्याने मुलाला मारहाण
येवदा : वहितीकरिता ट्रॅक्टर न मिळाल्याने चालकाच्या वाहनमालकाच्या मुलाला घराबाहेर बोलावून डोक्यावर विटेने प्रहार करण्यात आला. ही घटना रामतीर्थ येथे १९ जुलै रोजी घडली. याप्रकरणी अक्षय विनोद मानकर (२६) याच्या तक्रारीवरून गावातीलच मारुती शंकर खडे, सुमीत माणिक खडे, जीवन दादाराव खडे यांच्याविरुद्ध २० जुलै रोजी येवदा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
--------
दारूची बाटली डोक्यावर मारली
वरूड : तालुक्यातील चांदस येथे अंकुश प्रल्हाद घोरपडे (२३) याला गणेश जनार्दन कुबडे (३५) याने गावात फिरायला चल, असे म्हटले. त्याने नकार देताच गणेशने अंकुशच्या डोक्यावर देशी दारूची बाटली फोडली. याप्रकरणी वरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
-------------
५० हजारांच्या वसुलीसाठी मारहाण
मोर्शी : दीड लाख रुपयांतील एक लाख परत करणारे प्रवीण वासुदेव ठाकरे (४१, रा. हनुमाननगर) यांनी ५० हजार रुपये दोन दिवसांत परत करतो म्हणताच सारंग दामोदर मानकर (३०, रा. पंचवटी चौक, अमरावती) याने लोखंडी वस्तूने मनगटावर व खांद्यावर मारहाण केली तसेच शिवीगाळ केली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
--------------