क्षुल्लक कारणावरून महिलेला काठीने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:13 IST2021-03-14T04:13:40+5:302021-03-14T04:13:40+5:30

--------------------------------------- दुचाकी अपघातात युवक जखमी अमरावती : दुचाकीने अन्य दुचाकीला दिलेल्या धडकेत युवकाच्या पायाला इजा झाल्याची घटना चांगापूर फाट्यावर ...

Beating a woman with a stick for trivial reasons | क्षुल्लक कारणावरून महिलेला काठीने मारहाण

क्षुल्लक कारणावरून महिलेला काठीने मारहाण

---------------------------------------

दुचाकी अपघातात युवक जखमी

अमरावती : दुचाकीने अन्य दुचाकीला दिलेल्या धडकेत युवकाच्या पायाला इजा झाल्याची घटना चांगापूर फाट्यावर ८ मार्च रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी दुचाकी क्रमांक एमएच २७-५१०१ च्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. फिर्यादी व जखमी अमोल प्रल्हादराव कपले (३८, रा. मेहेरबाबा कॉलनी दस्तुर नगर) यांनी गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविली. फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीने दर्यापूरकडे जात असताना चालकाने वाहन भरधाव चालवून फिर्यादीच्या वाहनाला डाव्या बाजूला धडक दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

--------------------------------------

रतनगंज झोपडपट्टीत जुगार पकडला

अमरावती : नागपुरी गेट पोलिसांनी येथील रतनगंज झोपडपट्टीत कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह १,९५० रुपयांचा मुद्देमाल शुक्रवारी जप्त केला. आरोपी रामविलास ऊर्फ मिन्ना नानकलाल साहू (५१, रा. मसानगंज), प्रकाश भगवानदास गुप्ता (६२, रा. रतनगंज) विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

Web Title: Beating a woman with a stick for trivial reasons