बेघर निवारा केंद्रातील इसमाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:11 IST2021-06-25T04:11:32+5:302021-06-25T04:11:32+5:30

अमरावती : बडनेरा येथील बेघर निवारा केंद्रातून बाहेर जाण्यास मनाई करून एका इसमाला काठीने मारहाण करण्यात आली. ही घटना ...

Beating of Isma in a homeless shelter | बेघर निवारा केंद्रातील इसमाला मारहाण

बेघर निवारा केंद्रातील इसमाला मारहाण

अमरावती : बडनेरा येथील बेघर निवारा केंद्रातून बाहेर जाण्यास मनाई करून एका इसमाला काठीने मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी बडनेरा स्थित चांदणी चौकातील बेघर निवारा केंद्रात घडली. गौतम भिमराव गोडे (५१ रा. बेघर निवारा, बडनेरा) याच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी किशोर मरकाम (४० रा. वडद) याच्याविरुध्द गुन्हा नोंदविला.

----------------------------------

म्हशीला मारहाण केल्याने मारहाण

अमरावती : म्हशीला मारहाण केल्याच्या कारणावरून एका इसमाला लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी मोतीनगरात घडली. अब्दुल शहिद शेख करीम (३४ रा. मोतीनगर, बडनेरा) यांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी सलाउद्दीन अलाउद्दीन (४५ रा. मोतीनगर, बडनेरा) यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविला.

-------------------------------------------

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अमरावती : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याची घटना बुधवारी नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. मुलगी कुणालाही न सांगता घरातून बाहेर गेली. त्यानंतर ती परतली नाही. या घटनेची तक्रार कुटुंबीयांनी नागपुरी गेट पोलिसात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुध्द अपहरणाचा गुन्हा नोंदविला.

--------------------------------------------

६० हजारांची जनावरे लंपास

अमरावती : वलगाव ठाण्याच्या हद्दीतील सालोरा गावातून बकऱ्या, बोकूड असे ६० हजार रुपये किमतीची जनावरे चोराने लंपास केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली. वलगाव पोलिसांनी विक्की विष्णु गुजरे (२७रा. पूर्नवसन, सालोरा बु.) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंदविला.

Web Title: Beating of Isma in a homeless shelter