माहेरी आलेल्या मुलीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:16 IST2021-08-20T04:16:46+5:302021-08-20T04:16:46+5:30

----- भाईपूर शिवारात वहिवाटीचा रस्ता अडविला मोर्शी : तालुक्यातील भाईपूर शिवारात दिनेश वसंतराव पोके याने शेतातील वहिवाटीच्या रस्त्यावर कुंपण ...

Beating the girl who came to Maheri | माहेरी आलेल्या मुलीला मारहाण

माहेरी आलेल्या मुलीला मारहाण

-----

भाईपूर शिवारात वहिवाटीचा रस्ता अडविला

मोर्शी : तालुक्यातील भाईपूर शिवारात दिनेश वसंतराव पोके याने शेतातील वहिवाटीच्या रस्त्यावर कुंपण टाकून रस्ता अडविला. याबाबत विचारणा केली असता, शिवीगाळ व लोटलाट केल्याची फिर्याद योगेश पुंडलिकराव जूआरे यांनी मोर्शी पोलीस ठाण्यात नोंदविली. मोर्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

----

रोडरोमिओकडून चाकूने वार

पथ्रोट : नजीकच्या परसापूर येथील आठवडी बाजारात आठवडी बाजारात भाजी घेण्यासाठी आलेल्या युवतीचा पाठलाग करणाऱ्या युवकाला तिच्या भावाने जाब विचारला असता, त्याने चाकूचे वार करून त्याला जखमी केले.

पोलीस सूत्रांनुसार, रूपेश नाना घासले (२४, रा. परसापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने किचेनच्या छोट्या चाकूने शिवा रूपराव पचारे (१९, रा. परसापूर) याच्या डाव्या कुशीवर, पाठीवर वार करून त्याला जखमी केले. याप्रकरणी पथ्रोट पोलिसांनी १७ ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदविला.

-------

पथ्रोट येथे दोन गटात मारहाण

पथ्रोट : येथील आठवडी बाजार परिसरात दोन गटात झालेल्या मारहाणीची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली. कौसर बेग जाकीर बेग (१८) या युवकाची बंटी ऊर्फ रियाज मोहम्मद शाकीर, सिमी मोहम्मद शाकीर, शेख इलियास शेख ईनायत, रिजवान, इबरान शेख इलियास, शबरान शेख इलियास यांनी दुचाकी अडविली आणि शबरानने रॉडने मारहाण करून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली. दुसरीकडे शेख इबरान (२३) याच्या फिर्यादीवरून कौसर बेग जाकीर बेग, जाकीर बेग सत्तार बेग, शेख अहफाज व अन्य अनोळखी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांनी मारहाण केल्याची तक्रार नोंदविण्यात आली.

Web Title: Beating the girl who came to Maheri