अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वल ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:16 IST2021-09-15T04:16:49+5:302021-09-15T04:16:49+5:30

चिखलदरा : अंदाजे पाच वर्षांचे अस्वल मंगळवारी सकाळी ७ वाजता चिखलदरा-घटांग मार्गावरील बोरी गावानजीकच्या कलागुरु नाल्याजवळ अस्वल मृतावस्थेत आढळून ...

A bear was killed in a collision with an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वल ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वल ठार

चिखलदरा : अंदाजे पाच वर्षांचे अस्वल मंगळवारी सकाळी ७ वाजता चिखलदरा-घटांग मार्गावरील बोरी गावानजीकच्या कलागुरु नाल्याजवळ अस्वल मृतावस्थेत आढळून आले. पहाटे ४ वाजताच्या सुमारास दाट धुक्यामुळे अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा कयास व्याघ्र अधिकाऱ्याने लावला आहे.

बोरीनजीकच्या कलागुरू नाल्याच्या नजीक रस्त्यावर मृतावस्थेत अस्वल पडून होते. या मार्गावर पहाटे मोठ्या प्रमाणात रेतीचे ट्रक धावत असल्याची माहिती असून त्यातीलच अज्ञात वाहनाने पहाटे दाट धुक्यात रस्ता ओलांडणाऱ्या मादा अस्वलाला धडक दिली ही धडक जोरदार असल्याने अस्वलाचा रस्त्याच्या कडेला पडून मृत्यू झाला अस्वल ठार झाल्याचे माहिती परिसरातील नागरिक आदिवासी नागरिकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पाहण्यासाठी गर्दी केली होती. मेळघाट वन्यजीव विभागाअंतर्गत चिखलदरा वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश वाळके व कर्मचाऱ्यांनी मृत अस्वलाला उचलून त्याचे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत शवविच्छेदन केल्याचे सांगण्यात आले पुढील तपास अधिकारी करीत आहे

बॉक्स

तोंडावर मार लागल्याने मृत्यू

अस्वलाच्या अंगार मोठ्या प्रमाणात केस असतात त्यामुळे मृत अस्वलाच्या तोंडातून रक्तस्राव होत असल्याचे दिसून आले वाहनाने तोंडावरच जोरदार धडक दिली त्यामुळे अस्वलाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

140921\1422-img-20210914-wa0010.jpg

अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वल ठार

Web Title: A bear was killed in a collision with an unknown vehicle