मूकबधिर विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्यास कडक शिक्षा व्हावी

By Admin | Updated: October 9, 2016 01:07 IST2016-10-09T01:07:15+5:302016-10-09T01:07:15+5:30

अपंग, मूकबधिर, अंध, युवती, महिला, विद्यार्थिनींच्या असहायतेचा फायदा घेऊन मानसिक अत्याचार करण्याच्या घटना नेहमीच घडतात.

To be punished severely for those who are abusive about the women who are abusive | मूकबधिर विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्यास कडक शिक्षा व्हावी

मूकबधिर विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्यास कडक शिक्षा व्हावी

मोर्शी : अपंग, मूकबधिर, अंध, युवती, महिला, विद्यार्थिनींच्या असहायतेचा फायदा घेऊन मानसिक अत्याचार करण्याच्या घटना नेहमीच घडतात. मूकबधिर विद्यार्थिनीसोबत अशीच घटना अमरावती व अमहमदनगर येथे नुकतीच घडली. अशा घटना वारंवार घडू नये. अपंगांना सुरक्षितता व संरक्षण मिळावे या दृष्टीने महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेने गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना निवेदन दिले.
यामध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांचे नेतृत्वात सर्वश्री दिलीप वसू, दीपेश वानखडे, अरुण यावले, भगवंत गजभिये, दिलीप तानोळकर, प्रवीण वानखडे, रमेश गाउगे, राउत इत्यादींचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांची भेट घेऊन मूकबधिर, अंध, अपंग यांचेवर लैंगिक अत्याचार, बलात्कार कारणाऱ्या नराधमास कडक शिक्षका व्हावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: To be punished severely for those who are abusive about the women who are abusive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.