सावधान! ‘मनभरी’त पालींचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2016 00:24 IST2016-09-26T00:24:13+5:302016-09-26T00:24:13+5:30
तुम्ही चवीने मनभरीची उत्पादने सेवन करीत असाल तर सावधान! मनभरीचे उत्पादन केले जात असलेल्या केंद्रात पालींचा सर्रास वावर असतो.

सावधान! ‘मनभरी’त पालींचा वावर
एफडीए नियमावलीचे उल्लंघन : विदर्भात सर्वदूर मनभरी बँ्रडची विक्री
अमरावती : तुम्ही चवीने मनभरीची उत्पादने सेवन करीत असाल तर सावधान! मनभरीचे उत्पादन केले जात असलेल्या केंद्रात पालींचा सर्रास वावर असतो. तुम्ही खाता ते अन्न पोषक आहे की विषारी हे कळू शकेल, असा कुठलाही उपाय तुमच्या हाती नाही. त्यामुळे केवळ सावधान असणे, सतर्क असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
'मनभरी' चिवड्याच्या सिलबंद पाकिटात अख्खी पाल आढळली. पूर्ण पाल तळली गेली होती. सांगाड्यासह तळली गेल्याने ती कडक झालेली होती. पालीची शेपटीदेखील त्यामुळे मूळ आकारात कायम होती. पालीच्या पायाची सर्व बोटेदेखील बघू शकता येत होती. पूर्ण पाल तळली गेल्यानंतर ती तेलातून बाहेर काढली जाते. चिवड्यात ती मिसळली जाते. तो चिवडा एका मोठ्या पाकिटात टाकला जातो. पालही त्यासोबत चिवड्यात टाकली जाते. पाकिट सिल केले जाते. तरीही मनभरीच्या कर्मचाऱ्यांना काहीच कळत नाही, हे कसे? पाकिटावर किंमत छापण्यात कधीही चूक होणार नाही, याची दक्षता घेता येत असेल तर चिवड्यात विषारी प्राणी जाऊ नये,याचीही दक्षता घेणे शक्य नाही काय?