वाहनांना मॉडिफाईड सायलेन्सर लावाल तर खबरदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:13 IST2021-07-28T04:13:12+5:302021-07-28T04:13:12+5:30
पोलीस शहरात माॅडिफाईड सायलेन्सर लावलेल्या वाहनांच्या आवाजामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याचे निदर्शनास आले होते. पोलीस आयुक्त डाॅ.आरती सिंह ...

वाहनांना मॉडिफाईड सायलेन्सर लावाल तर खबरदार
पोलीस शहरात माॅडिफाईड सायलेन्सर लावलेल्या वाहनांच्या आवाजामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याचे निदर्शनास आले होते. पोलीस आयुक्त डाॅ.आरती सिंह यांनी मॉडिफाईड सायलेन्सर असलेल्या दुचाकी वाहनांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यावरून पोलीस उपायुक्त परिमंडळ २ चे शशीकांत सावत, पोलीस उपायुक्त मुख्यालय विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनात शहर वाहतूक शाखेकडून अशा वाहनांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. दुचाकीस्वारांनी मोठ्या प्रमाणात वाहनाचे सायलेन्सरमध्ये माॅडिफिकेशन केल्याचे शोधमोहिमेत निष्पन्न झाले. त्यामुळे अशा दुचाकी वाहनचालकांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.शहर वाहतूक शाखेतर्फे १५ वाहनचालकांवर माॅडीफिकेशन केल्याबाबत शहर वाहतूक शाखा कार्यालय येथे डिटेन केलेल्या वाहनांचे सायलेन्सरमध्ये बदल करून लंबंधितांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. बऱ्याच दुचाकींमध्ये सायलेन्सर माॅडिफाय न करता मागच्याबाजूला मडगार्डला होल करून विशिष्ष्ट आवाज काढला जात असल्याचे आढळून आले. अशा दुचाकीचे मडगार्ड काढून घेण्यात येत आहे.
यासंदर्भात दुचाकीस्वारांना शहर वाहतूक शाखेकडून आवाहन करण्यात येत आहे. त्यांनी आपल्या दुचाकीचे सायलेन्सर माॅडिफाय केले असतील तर त्यात सुधारणा करून घ्यावी. जेणेकरून सायलेन्सरच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होणार नाही. यापुढे सायलेन्सर माॅडिफाॅईड केलेली दुचाकी वाहने आढळल्यास त्यांळ्याविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई करून वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्यात येईल, अशी सूचनाही पोलीस आयुक्तांनी दिली आहे.