दसऱ्यासाठी जंगलातून ‘सोनं’ चोराल तर सावधान!
By Admin | Updated: October 21, 2015 00:25 IST2015-10-21T00:25:57+5:302015-10-21T00:25:57+5:30
सोन्यापेक्षाही मौल्यवान जंगलातील वृक्ष आहेत. दसरा सण आला त्यासाठी जंगलातील ‘सोनं’ चोरीला जाण्याची भीती वन विभागाला आहे.

दसऱ्यासाठी जंगलातून ‘सोनं’ चोराल तर सावधान!
वन विभागाची चौकस नजर : पोहरा, चिरोडी जंगलात वन विभागाचे कर्मचारी तैनात
पोहरा बंदी : सोन्यापेक्षाही मौल्यवान जंगलातील वृक्ष आहेत. दसरा सण आला त्यासाठी जंगलातील ‘सोनं’ चोरीला जाण्याची भीती वन विभागाला आहे. त्याचे रक्षण करण्यासाठी वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्राच्या जंगलात वनविभागाने गस्त वाढविण्यासोबत या जंगलात कॅमेऱ्याचीही मदत घेतली आहे. दसरा सणसाठी जंगलातील सोन्याच्या वृक्षाला प्रथम इजा करतात. शमी वृक्षासह आंजन व कांचनच्या वृक्षाची कत्तल करण्यात येते. या मोहिमेची सुरूवात पोहरा व चिरोडी वनक्षेत्रात सुरू आहे. जंगलात अवैधरीत्या शिरुन वृक्षतोड करणे झाडांना इजा पोहोचविणे, फांद्या तोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार असून दसऱ्याच्या आदल्या दिवशी शमीच्या झाडांना इजा पोहोचून अमरावती शहरात पानांची व फांद्याची विक्री करण्यात येते. शमी वृक्षाची पाने ‘सोनं’ म्हणून वापरली जातात. अलीकडे शमीची झाडे नामशेष होऊ लागली आहेत. त्याला पर्याय म्हणून अलीकडे बनावट सोन्याप्रमाणे आंजन चाफाची मोठी पानेसुद्धा दसऱ्याला आदानप्रदान केली जातात. शमीची व सोन्याचे झाडे नामशेष होऊ नये म्हणून आपापल्या वनक्षेत्रात समाविष्ठ वन कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. त्यावर आता वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील पोहरा, चिरोडी, भानखेड, माळेगाव, मार्डी, कारला, इंदला, मासोद, परसोडा, पिंपळखुटा, बोडणा, सावंगा आदी वनक्षेत्रात खडा पहारा लावला असून अमरावती शहरात पानाची विक्री होते. यासाठी उपवनसंरक्षक निनू सोमराज यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पि. के. लाकडे व चांदूररेल्वेचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत गावंडे यांनी या जंगलात प्रवेश न करू देण्यासाठी चिरोडीचे वनपाल सदानंद पाचंगे, पोहराचे वनरक्षक मनोज ठाकूर, नेतनवार खडसे, महाजन, शेंडे, कऱ्हे, नाईक, धारोडे, देशमुख, कोरडे, वानखडे, पळसकर, नेवारे, छोटे, शाली पवार, राजू चव्हाण, शब्बीर शाह, शेख रफीक, बिसू पठान, रामू तिडके आदी कर्मचारी तैनात करून गस्त करणार आहेत. (वार्ताहर)