-तर खबरदार, गृहराज्यमंत्र्यांचा इशारा

By Admin | Updated: July 7, 2016 00:02 IST2016-07-07T00:02:18+5:302016-07-07T00:02:18+5:30

शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था सुस्थितीत आणण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी बुधवारी दिले.

-Be careful, hint of homework | -तर खबरदार, गृहराज्यमंत्र्यांचा इशारा

-तर खबरदार, गृहराज्यमंत्र्यांचा इशारा

मुद्दा वाहतुकीचा : महापालिका, पोलिसांना अल्टिमेटम
अमरावती : शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था सुस्थितीत आणण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी बुधवारी दिले. यासाठी ना. पाटील यांनी महापालिका व पोलीस प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
अनियंत्रित वाहतूक व्यवस्था जागेवर आणण्यासाठी आमदार सुनील देशमुख सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यांच्याच पुढाकाराने बुधवारी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी विश्रामभवनात पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, महापालिका आयुक्त हेमंत पवार व अन्य अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. या बैठकीत गृहराज्यमंत्री पाटील यांनी शहरातील ‘नो एंट्री’ मार्गाची अधिसूचना तातडीने काढण्याचे आणि बंद अवस्थेतले ट्रॅफिक सिग्नल लगेच दुरूस्त करण्याचे आदेश दिले.

पार्किंग विकणाऱ्यांवर कारवाई
अमरावती : ट्रॅफिक सिग्नलची ज्या चौकांमध्ये आवश्यकता आहे, त्या ठिकाणी सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याची सूचना ना. पाटील यांनी दिली. व्यावसायिक संकुल व प्रतिष्ठाना समोरची पार्किंग गडब करणाऱ्या सर्व मंडळींवर कारवाई करून पार्किंग व्यवस्था करण्याचे आधिकाऱ्यांना सांगितले. ज्या व्यापाऱ्यांंनी आपल्या व्यवसायासाठी फुटपाथ ताब्यात घेतले आहे, अशा सर्व व्यापाऱ्यांवर कारवाई करून ते मोकळे करा आणि अहवाल सादर करण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांंना सांगितले. ही सर्व कारवाई येत्या १५ दिवसात पूर्ण करण्याचा अल्टीमेटम त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. यावेळी पोलीस उपायुक्त व महापालिका उपायुक्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: -Be careful, hint of homework

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.