सावधान! वेगाने वाहन चालवता? तुम्हाला न कळता होणार दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:13 IST2021-07-27T04:13:27+5:302021-07-27T04:13:27+5:30
फोटो - रडार २६ पी नरेंद्र जावरे - परतवाडा : रस्ताने भरधाव वेगाने वाहन चालवत जात असाल, कोणीतरी तुमच्यावर ...

सावधान! वेगाने वाहन चालवता? तुम्हाला न कळता होणार दंडात्मक कारवाई
फोटो - रडार २६ पी
नरेंद्र जावरे - परतवाडा : रस्ताने भरधाव वेगाने वाहन चालवत जात असाल, कोणीतरी तुमच्यावर लक्ष ठेवत आहे, हे लक्षात घ्या. कारण थेट दंडात्मक कारवाई तुमच्यावर होणार आहे, हे निश्चित. कारण ग्रामीण पोलिसांच्या दिमतीला इंटरसेप्टर हे वाहन पंधरा दिवसापूर्वी उपलब्ध झाले आहे. या कालावधीत त्याने तब्बल ४४ लक्ष रुपयांचा दंडात्मक महसूल पोलीस प्रशासनाला मिळवून दिला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सदरचे अपघात हे अतिवेगाने वाहन चालविल्याने होत असल्याची बाब निदर्शनास आल्याने राज्याचे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांना पत्रव्यवहार करून अतिवेगाने वाहन चालवित असणारे वाहनांवर जरब बसावा, या उद्देशाने इंटरसेप्टर वाहन उपलब्ध करून देण्याबाबत विनंती करण्यात आली होती. त्यानुसार १३ जुलै रोजी अमरावती ग्रामीण पोलिसांना इंटरसेप्टर वाहन उपलब्ध झाले. रस्ताने भरधाव वेगाने धावणाऱ्या वेगमर्यादा ओलांडून जाणाऱ्या वाहनांची नोंद या वाहनातून केली जाते आणि त्यातून दंडात्मक कारवाई होत आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण मार्ग रडारवर
जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या महत्त्वाच्या रस्त्यांमध्ये अमरावती ते आसेगाव-परतवाडा, दर्यापूर-अंजनगाव, माहुली-मोर्शी-वरूड, चांदूर रेल्वे तळेगाव दशासर व तिवसा हे मार्ग असून, यावर इंटरसेप्टर वाहनाद्वारे अतिवेगाने वाहनप्रकरणी एकूण ४३९३ प्रकरणे नोंदवून करुन ४३,९३,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
बॉक्स
अपघात कमी होण्याची शक्यता
वाहनचालकांनी वेगमर्यादेचे उल्लंघन करू नये. प्रत्येक महामार्ग व इतर रस्ते अशा ठिकठिकाणी संबंधित विभागाने लावलेले वेगमर्यादेचे फलक पाहून दिलेल्या वेगमर्यादेतच वाहन चालविल्यास आपणावर दंडात्मक कारवाई होणार नाही. वेगमर्यादत वाहन चालविल्याने अपघात टळू शकतात, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांनी यांनी केले आहे
260721\img-20210726-wa0042.jpg
जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या दिमतीला दाखल झालेले इंटरसेप्टर वाहन