सावधान ! जिल्हा क्र ीडा संकुलाचे ट्रॅक धोकादायक
By Admin | Updated: September 21, 2016 00:18 IST2016-09-21T00:18:21+5:302016-09-21T00:18:21+5:30
सावधान! येथील जिल्हा क्रीडा संकुलातील रनिंग ट्रॅक अतिशय धोकादायक झाला आहे.

सावधान ! जिल्हा क्र ीडा संकुलाचे ट्रॅक धोकादायक
क्रीडा विभागाचे दुर्लक्ष : 'मॉर्निंग वॉक'दरम्यान विद्यार्थी जखमी
संदीप मानकर अमरावती
सावधान! येथील जिल्हा क्रीडा संकुलातील रनिंग ट्रॅक अतिशय धोकादायक झाला आहे. मॉर्निंग वॉक व इव्हिनिंग वॉकला जाणाऱ्यांनासुध्दा ही धोक्याची घंटा आहे. यामुळे क्रीडाप्रमींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. याकडे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहेत. अनेक क्रीडाप्रेमी या ट्रॅकवर किरकोळ जखमीसुध्दा होत आहेत.
येथील रनिंग ट्रॅकवर २६ जानेवारीच्या शासकीय कार्यक्रमासाठी एक ठेकेदाराला या मैदानावर माती टाकून मैदानाची लेवल लावण्याचा कंत्राट क्रीडा समितीने दिला होता. परंतु या ठिकाणी लाल माती टाकण्यात आली. त्यात रेतीचे कण असल्यामुळे हा रनिंग ट्रॅकपूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे ट्रॅकचा वरील थर खराब झाल्याने तो रनिंगसाठी योग्य नसल्याचा आरोप क्रीडा परिषदेचे पदधिकारी राजेंद्र पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना केला आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते हे जिल्हा क्रीडा समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अधिकारात मैदानाचे मेंटन्स करण्याचा त्यांना अधिकार आहेत. क्रिडाप्रमेंची भावना लक्षात घेता योग्य पदध्दतीने नियमाने हा रनिंग ट्रॅक तयार करावा अशी मागणी करण्यात आली आहे. रनिंग ट्रॅक तयार करताना योग्य प्रकारे ट्रॅक तयार करणे गरजेचे आहे. येथे टेकनिकल पध्दतीने विटांचा चुरा टाकूण, मुरुम टाकूण, या मातीत पाणी शोसून घेण्याची क्षमता या ट्रॅकमध्ये असली पाहिजे.असे ट्रॅक तयार करण्यात यावा अशी भावना क्रिडा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या ठिकाणी रनिंग ट्रॅकवर बारीक रेतीचे कण निर्माण झाले असल्यामुळे रनिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांचे किरकोळ होत आहे. येथे मोठा अपघातही होऊ शकते, याला जबाबदार कोण, असा प्रश्न पडत आहे. येथे शेकडो लहान विद्यार्थीसुध्दा सराव करण्यास येथे रोज येतात. त्यांच्या पायाला रेती रुतून ईजा होऊ शकते. अनेक विद्यार्थी या ठिकाणी पाय घसरून जखमीही होत आहेत. रनिंग ट्रॅक तयार करताना याची काही नियमावली असते. त्याचे पालक होणे गरजेचे आहे. परंतु क्रीडा विभागाच्या नियमांची पूर्णपणे पायमल्ली होत असल्याचा आरोप अनेक क्रीडाप्रेमींनी केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे
जिल्हा क्रीडा संकुलाचा रनिंग ट्रॅक तयार करताना यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. पण प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमाकरिता या मैदानावर लाल माती टाकण्यात आली होती. हा प्रकार नियमबाह्य असून त्यामुळेच हा ट्रॅक खराब झाला आहे. हा ट्रॅक धावण्यायोग्य नसल्याचे मत क्रीडातज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जिल्हा क्रीडा समितीचे अध्यक्ष जिल्हधिकारी किरण गित्ते असून त्यांनी क्रीडाप्रेमींच्या मुद्यावर लक्ष घालून नियमाने चांगला ट्रॅक तयार करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
क्रीडा संकुलाचा रनिंग ट्रॅक नियमांने खेळण्यात किंवा धावण्यात योग्य नाही. लाल मातीच्या रेतीकणांमुळे अपघात होऊ शकतो. यापूर्वीसुद्धा क्रीडा विभागाला तक्रार दिली होती.
- राजेंद्र पाटील, पदधिकारी क्रिडा परिषद अमरावती.