भ्रष्टाचाराबाबत सुजाण जनतेने जागरूक राहावे

By Admin | Updated: November 5, 2015 00:25 IST2015-11-05T00:25:17+5:302015-11-05T00:25:17+5:30

बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला आळा बसावा, या उद्देशाने दरवर्षी सतर्कता जागरूकता सप्ताह साजरा केला जातो

Be aware of the public about corruption | भ्रष्टाचाराबाबत सुजाण जनतेने जागरूक राहावे

भ्रष्टाचाराबाबत सुजाण जनतेने जागरूक राहावे

वक्तृत्व स्पर्धा : पोलीस आयुक्तांचे प्रतिपादन
अमरावती : बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला आळा बसावा, या उद्देशाने दरवर्षी सतर्कता जागरूकता सप्ताह साजरा केला जातो. सुजाण नागरिक या नात्याने सर्वांनी दक्ष राहून भ्रष्टाचाराला आळा घालण्यास पुढाकार घ्यावा, असे मत पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी केले.
विद्यापीठाचा संगणकशास्त्र विभाग व बँक आॅफ महाराष्ट्रच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा विद्यापीठाच्या दृकश्राव्य सभागृहात आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे बक्षीस वितरण व्हटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी कुलगुरू खेडकर, महेंद्र काबरा, संगणकशास्त्र विभाग प्रमुख विलास ठाकरे उपस्थित होते. पहिले पारितोषिक पूजा अशोक पाठक, दुसरे स्वप्निल इंगळे, तिसरे दीपिका सोनार यांनी पटकावले.

Web Title: Be aware of the public about corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.