बीडीडीएस पथकाने कोर्ट परिसर काढला पिंजून

By Admin | Updated: August 20, 2014 23:16 IST2014-08-20T23:16:09+5:302014-08-20T23:16:09+5:30

सुरक्षेच्या दृष्टीने बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून बुधवारी अमरावती न्यायालय परिसराची तपासणी करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी न्यायालयाचा संपूर्ण परिसर श्वान पथकाच्या साह्याने पिंजून काढला.

BDDS team removed court premises | बीडीडीएस पथकाने कोर्ट परिसर काढला पिंजून

बीडीडीएस पथकाने कोर्ट परिसर काढला पिंजून

अमरावती : सुरक्षेच्या दृष्टीने बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून बुधवारी अमरावती न्यायालय परिसराची तपासणी करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी न्यायालयाचा संपूर्ण परिसर श्वान पथकाच्या साह्याने पिंजून काढला.
नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने कुठली काळजी घेणे गरजेचे आहे या अनुषंगाने पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस आयुक्तालयात मिशन जागृती हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थांना सुरक्षेच्या दृष्टीने धडे दिले जात आहे. आगामी विविध उत्सव पाहून शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. सुरक्षेच्या दृष्टीने बस स्थानक, रेल्वे स्थानक, कोंडेश्वर व अंबादेवी परिसराची बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून कसून तपासणी केले जात आहे.
बुधवारी सकाळी ११ ते १२.३० वाजेपर्यंत या पथकाचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, मोहन डेवले, रवींद्र दलाल, भरत खारडे, संतोष पवार व डॉग हँडलर गवई यांनी दहशतवादी हल्ले लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालय परिसर पिंजून काढला. श्वान पथकाच्या साह्याने पोलिसांकडून न्यायालयातील पार्किंगमधील वाहनांची कसून तपासणी करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांना दिली. (प्रतिनिधी)

Web Title: BDDS team removed court premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.