शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण गरम! बावनकुळे बच्चू कडूंच्या भेटीस, उपोषण मागे घ्या... देश शोकात! बावनकुळेंची भावनिक साद

By शुभांगी काळमेघ | Updated: June 13, 2025 20:04 IST

अमरावतीतील उपोषण आंदोलनावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट : दिव्यांगांना ६,००० रुपये मानधन आणि शेतकरी कर्जमाफीसाठी आश्वासन

अमरावती :अमरावतीतील प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी गेल्या सहा दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर, आज राज्याचे महसूलमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबत झालेल्या  बैठकीतील मुख्य मुद्दे

  • दिव्यांगांना ६,००० रुपये मानधन: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या चर्चेत दिव्यांगांना इतर राज्यांप्रमाणे ६,००० रुपये मानधन देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. यासंदर्भात लवकरच पुरवणी काढण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
  • शेतकरी कर्जमाफी: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दोन दिवसांत समिती स्थापन करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. त्यांनी सांगितले की, "शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाल्यास आम्हीच सरकारचे कर्ज फेडू," असे ते म्हणाले.
  • इतर मागण्या: उर्वरित १७ मागण्यांसाठी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्याशी लवकरच बैठक होईल, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

बच्चू कडू यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलेला नाही. तथापि, चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशातील मोठ्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राच्या शोकस्मरणार्थ उपोषण मागे घेण्याची विनंती केली. कडूंच्या सांगण्याप्रमाणे, "सर्व राष्ट्र दुःखात आहे, त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे," अशी बावनकुळे यांनी त्यांना विनंती केली.

बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील, खासदार राजू शेट्टी आणि इतर शेतकरी संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. राजू शेट्टी यांनी १५ जून रोजी राज्यभरात चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली आहे. जर सरकारने मागण्या मान्य न केल्यास, हे आंदोलन राज्यभरात तीव्र होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर, चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, परंतु कडू यांनी अद्याप उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलेला नाही. 

 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेAmravatiअमरावतीRaju Shettyराजू शेट्टी