राष्ट्रवादीत अस्तित्वाची लढाई
By Admin | Updated: September 1, 2014 23:14 IST2014-09-01T23:14:08+5:302014-09-01T23:14:08+5:30
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद विकोपाला गेला असून गटनेता पदाचा वाद आता सवौच्च न्यायालयात पोहचला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरच राष्ट्रवादीत महापौरपदाच्या निवडणुकीचे

राष्ट्रवादीत अस्तित्वाची लढाई
गणेश वासनिक - अमरावती
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद विकोपाला गेला असून गटनेता पदाचा वाद आता सवौच्च न्यायालयात पोहचला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरच राष्ट्रवादीत महापौरपदाच्या निवडणुकीचे ‘राज’कारण ठरणार असल्याचे चित्र आहे.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या गटनेतेपदी अविनाश मार्डीकर यांची नियुक्ती कायम असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने हा निकाल शहराच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देणारा ठरू पाहत आहे.
काँग्रेसचे ‘वेट अॅन्ड वॉच’
महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटमध्ये सुरु झालेल्या अंतर्गत वादामुळे महापालिकेतील राजकारणाने वेगळे वळण घेतले आहे. विधानसभा, महापौर पदाची निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्ष सावध पावले टाकत आहे. काँग्रेसला महापौर पदापेक्षा विधानसभेची निवडणूक अती महत्वाची असल्याने ते ‘वेट अँन्ड वॉच’ करीत आहे.