बटाऊवाले हत्याप्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
By Admin | Updated: November 7, 2015 00:18 IST2015-11-07T00:18:17+5:302015-11-07T00:18:17+5:30
अमित बटाऊवाले हत्याकांडाला तीन महिने पूर्ण होण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असताना पोलिसांनी ...

बटाऊवाले हत्याप्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
पाच आरोपी अजूनही फरार : सात वाहने जप्त
अमरावती : अमित बटाऊवाले हत्याकांडाला तीन महिने पूर्ण होण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असताना पोलिसांनी न्यायालयाला दोषारोपपत्र दाखल केल्याने जुळ्या शहरात असलेल्या उलटसुलट अफवेला पूर्णविराम मिळाला आहे. या हत्याकांडात सरकारची बाजू मांडण्यासाठी खासगी विशेष शासकीय अभियोक्त्याची नियुक्ती करण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.
११ आॅगस्ट रोजी अमित बटाऊवाले या युवकाची भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर हत्या करून त्याचे वडील मोहन यांनी गंभीर जखमी केले होते. यात पोलिसांनी नगरसेवक मो. शाकीर हुसेन, राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष मो. आबीद मुल हुसेन तसेच मो. आदाब मो. गुल हुसेन, मो. वाजीद अब्दूल रहेमान उर्फ बाबू साहेब, मो. तालीम मो. गुल हुसेन उर्फ बादशाह, अबेदखान मुजफ्फरखान, अन्सारखाँ नियामत खाँ, मो. शारीक वल्द अब्दुल रहेमान, मो. मतीन वल्द मो. जाफर, जिसानअली इत्यादींना अटक केली आहे.
अफवांना पूर्णविराम
९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल झाल्याने अचलपूर-परतवाड्यात पसरलेल्या वेगवेगळ्या अफवांना पूर्णविराम बसला आहे. पोलीस मॅनेज झाले. सेटिंग झाले, आरोपींना व्हीआयपी वागणूक आदी अफवांनी जोर धरला होता. पण पोलिसांनी अगदी वेळेचा विलंब न करता दोषारोपपत्र दाखल केल्याने अफवा तथ्यहीन ठरल्या आहेत.
जामीन फेटाळला
अर्शद आणि अन्वर या दोघांनी गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा न्यायालयात जामीनसाठी अर्ज केला होता. पण न्यायालयाने तो फेटाळला होता. (प्रतिनिधी)