बासलापुरात १५ कावळे झाडावरून खाली पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:23 IST2021-02-05T05:23:06+5:302021-02-05T05:23:06+5:30
तीन कावळ्यांचा मृत्यू : अज्ञात रोगाचे थैमान चांदूर रेल्वे : तालुक्यातील बासलापूर येथे रविवारी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान १५ ...

बासलापुरात १५ कावळे झाडावरून खाली पडले
तीन कावळ्यांचा मृत्यू : अज्ञात रोगाचे थैमान
चांदूर रेल्वे : तालुक्यातील बासलापूर येथे रविवारी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान १५ कावळे झाडावरून खाली पडले. पैकी तीन कावळ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती गावक-यांकडून प्राप्त झाली आहे.
राज्यात बर्ड फ्लूची भीती असताना अचानक कावळे दगावल्याने ग्रामीण भागात ग्रामस्थांची पाचावर धारण बसली आहे. चांदूरबाजार व मेळघाटात कोंबड्या दगावल्याच्या घटना ताज्या असताना, रविवारी सकाळी बासलापूर येथे विश्वशांती बौद्धविहाराजवळ ४ व गावातील पुलाजवळ ११ कावळे खाली रस्त्यावर पडलेले गावक-यांना दिसले. या पक्ष्यांना उडता येत नव्हते व यामधील तीन कावळ्यांचा मृत्यू झाला. यावेळी वॉटरमॅन राजू चर्जन यांनी पक्ष्यांना पाणीसुध्दा पाजले. परंतु खाली पडलेले काही कावळेसुध्दा दगावण्याची शक्यता दिसत होती. गावक-यांनी पशुवैद्यकीय विभागाला त्याबाबत कळविले. पशुसंवर्धन विभागाची चमू जखमी कावळ्यांना उपचारासाठी अमरावतीला घेऊन गेली.