गावकऱ्यांच्या अर्जांना ग्राम पंचायतकडून केराची टोपली..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:13 IST2021-05-16T04:13:18+5:302021-05-16T04:13:18+5:30
फोटो पी १६ खोडगाव वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव येथील गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा हौद दुरुस्त करून ...

गावकऱ्यांच्या अर्जांना ग्राम पंचायतकडून केराची टोपली..
फोटो पी १६ खोडगाव
वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव येथील गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा हौद दुरुस्त करून त्यामध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
बऱ्याच दिवसापासून हा हौद बंद स्थितीत पडलेला आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू असून ह्या दिवसांमध्ये गुरांना पिण्याच्या पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सबब, २३ फ्रेबुवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते अनुरूप बसवंत यांनी ग्राम पंचायत कार्यालय खोडगाव यांना लेखी निवेदन दिले होते. परंतु सदर अर्जावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नव्हती म्हणून २६ मार्च या रोजी एक स्मरणपत्र दिले होते. आज जवळपास तीन महिने होऊन गेले. परंतु बंद स्थितीत पडलेल्या हौदावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत.