पायाभूत चाचणी परीक्षा गैरप्रकाराची चौकशी होणार
By Admin | Updated: September 29, 2015 01:35 IST2015-09-29T01:35:28+5:302015-09-29T01:35:28+5:30
पायाभूत चाचणी परीक्षांमध्ये शहरातील काही शाळांनी विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच लिखीत उत्तरे दिलीत. ही बाब वृत्तातून लोकमत ने

पायाभूत चाचणी परीक्षा गैरप्रकाराची चौकशी होणार
वैभव बाबरेकर ल्ल अमरावती
पायाभूत चाचणी परीक्षांमध्ये शहरातील काही शाळांनी विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच लिखीत उत्तरे दिलीत. ही बाब वृत्तातून लोकमत ने उघड केल्यावर शिक्षण विभागात खळबळ उडाली. या गैरप्रकाराची चौकशी करण्याचा निर्णय शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी घेतला असून संबंधित शाळेत जाऊन तीन अधिकारी चौकशी करणार आहेत.
शिक्षणाच्या दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने व विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी सर्व शाळामध्ये पायाभूत चाचणी घेण्याचे आदेश शासनाने शिक्षणाधिकारींना दिले. त्यानुसार जिल्ह्यातील २ हजार २०० शाळेत इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी परीक्षा सुरू झाली. १४ ते ३० सप्टेंबरपर्यंत पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यात येणार असून आतापर्यंत बहुतांश शाळांनी ही चाचणीसुध्दा घेतली आहे. मात्र, शहरातील काही शाळेमध्ये पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित देण्यात येत असल्याची माहिती 'लोकमत'ला मिळाली. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना पायाभुत चाचणीचे लिखित उत्तरे देत असल्याचे 'लोकमत'च्या निदर्शनास आले आहे.
याबाबत 'लोकमत'ने २४ सप्टेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करताच शिक्षण विभागात खळबळ उडाली. वृत्ताची दखल घेऊन प्राथमिकचे शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी चौकशी सुरु केली आहे. या चौकशीकरिता तीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून ते संबंधित शाळेची चौकशी करणार आहे.