शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरच बार; दारू पिऊन वाद घालणाऱ्या तळीरामांना कोण आवरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 11:14 IST

खुलेआम मद्यप्राशन : नागरिकांचा वाढला त्रास

मनीष तसरे लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शहरात किरकोळ कारणातून वाद, हाणामारीच्या घटना एकीकडे वाढत असताना दुसरीकडे रहदारीच्या रस्त्यावर खुलेआम झिंगणाऱ्या मद्यपींचेही प्रमाण वाढू लागले आहे.

रस्त्यावर किंवा मोकळ्या भूखंडावर निर्जन भागात रात्रीच्यावेळी बसणाऱ्या मद्यधुंदांना आवरणार कोण? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. अनेक मद्यपी सकाळपासून दारू पिण्यासाठी येतात. पाण्याची बाटली, ग्लास विक्रीचे दुकान प्रत्येकच चौकात असल्याने मद्यपी याच ठिकाणी खुलेआम दारू पितात. 

शहरातील अनेक चौकात रस्त्यावर दारू पिण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. याकडे गस्तीवर असलेले पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून डोळेझाक का केली जात आहे. यापूर्वीही दारू पिण्यासाठी उघड्यावर एकत्र बसलेल्या टोळक्यांमध्ये वाद होऊन खून झाल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. रस्त्यांवर बार भरविणाऱ्यांना आणण्यासाठी वठणीवर पोलिसांना दारूड्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारावा लागणार असल्याचे नागरिकांचे मत आहे.

या ठिकाणी रस्त्यावरच झिंगाट जुना बायपास मार्ग  दस्तूर नगर चौकाच्या पुढे बडनेरा मार्गावर रस्त्यावरच काही अंतरावर मद्याचे दुकान असल्याने येथे अगदी रस्त्यावरच बाहेर दररोज अनेक मद्यपी या चौकात सकाळपासून दारू पितात.

सूतगिरणी मैदानावर युवा व्हाउचर साप्ताहिक पारितोषिक TEC APPLY रोज संध्याकाळी या ठिकाणी खुल्या जागेत अंधाराचा फायदा घेत ओपन बार थाटतात. येथे अनेकदा वादविवाद होतात. ज्यामुळे स्थानिक वातावरण अस्वस्थ होते. मद्यपींच्या दारू पिण्याच्या भानगडीमुळे इथे येणाऱ्या व्यक्तींना मानसिक त्रास होतो.

शेगाव नाका चौक या चौकात महिला वसतिगृह, शाळा, महाविद्यालय आहे. अनेक मद्यपी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भिंतीला लागून तसेच अनेक जण पोलिस स्टेशनच्या भिंतीला लागून दारूच्या बाटल्या रिचवतात. 

महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न शहरातील काही चौकात महिला वसतिगृह, शाळा, महाविद्यालय आहे. अनेक मद्यपी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भिंतीला लागून तसेच अनेक जण पोलिस स्टेशनच्या भिंतीला लागून दारूच्या बाटल्या रिचवतात.

वाहनचालक, पादचाऱ्यांना त्रास अनेक मद्यपी रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर दारू पितात. त्यामुळे पादचारी, वाहनचालक यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.

पोलिसांची मद्यपीवर कारवाई "रस्त्यावर मद्यपी दारू पित असेल तर त्यांच्यावर प्रत्येक पोलिस स्टेशन निहाय कारवाई केल्या जात आहे. रात्रीच्या वेळी शहरातील चौकात तसेच निर्जन स्थळी लोक एकत्रीत येवून दारूपार्च्छा करत असेल तर पोलिस त्यांच्यावर कारवाई करतात."- नवीनचंद्र रेड्डी, शहर पोलिस आयुक्त

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती