एका पायाने अधू, सायकलने गाठले १९० किमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:36 IST2021-01-08T04:36:51+5:302021-01-08T04:36:51+5:30

वरूड : १७ दिवसांत १९० किमी सायकलने प्रवास ही काही नवलाईची गोष्ट नाही. मात्र, एका पायाने अधू असलेल्या व्यक्तीचा ...

Barefoot on one foot, the bicycle reached 190 km | एका पायाने अधू, सायकलने गाठले १९० किमी

एका पायाने अधू, सायकलने गाठले १९० किमी

वरूड : १७ दिवसांत १९० किमी सायकलने प्रवास ही काही नवलाईची गोष्ट नाही. मात्र, एका पायाने अधू असलेल्या व्यक्तीचा हा प्रवास कौतुकास्पद आहे. तालुक्यातील करजगाव गांधीघर येथील प्रबोधनपर कीर्तनकार मोहनदास लांडगे यांनी ही कामगिरी केली.

मोहनदास लांडगे हे ४ डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील तीर्थस्थळांना भेटी दिल्या. करजगाव येथून सुरूवात केल्यानंतर बेनोडा मार्गे झोम्बाडीचा मारुती , नबाब मोगरशा बाबा (खडका जामगाव), भिवकुंडी येथील अंबादेवी, दादाजी धुनीवाले दरबार (पाठा), रामजीबाबा देवस्थस्थान (मोर्शी), पीरबाबा (उमरखेड) अशी १९० किमीची वारी करून ते परत करजगाव येथे आले. अस्थिव्यंग असताना सायकल प्रवास पूर्ण केल्याबद्दल योगेश ठाकरे, प्रभाकर लायदे, विष्णू लायदे आदींनी त्यांचा सत्कार केला.

Web Title: Barefoot on one foot, the bicycle reached 190 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.