बारदाना गोडाऊनला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:07 IST2018-05-01T00:07:43+5:302018-05-01T00:07:43+5:30
विलासनगरातील बारदाना गोडाऊनला सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत लाखोंंचा मुद्देमाल जळून खाक झाला. याप्रकरणी अजय बिजोरे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी बंटी बसरैया (रा. पन्नालालनगर) व शंकर मोटवानी (रा. गणपतीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

बारदाना गोडाऊनला भीषण आग
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विलासनगरातील बारदाना गोडाऊनला सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत लाखोंंचा मुद्देमाल जळून खाक झाला. याप्रकरणी अजय बिजोरे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी बंटी बसरैया (रा. पन्नालालनगर) व शंकर मोटवानी (रा. गणपतीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
गोडाऊनमध्ये सोमवारी सकाळी शॉर्ट सर्कीट झाल्याने आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. ट्रान्सपोर्ट उपकेंद्रातील फायरमन श्रीकांत जवंजाळ, शिवा आडे, हाजीखां, चालक सै. अमीन तसेच अग्निशमनचे फायरमन घाटे, हजारे, मोहसीन इकबाल, हर्षद दहातोंडे, सूरज लोणारे, चालक गोपाल धोकरे व बागडे यांनी तात्काळ पाण्याचे बंब घेऊन घटनास्थळ गाठले. तब्बल दोन तासानंतर आग नियंत्रणात आली.