संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी बार, बीअर शॉपी सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:13 IST2021-05-19T04:13:42+5:302021-05-19T04:13:42+5:30
तिवसा : शहरातील काही व्यावसायिक संचारबंदी नियमांचे उल्लंघन करीत असल्याने नगरपंचायत पथकाद्वारे कारवाईची मोहीम सुरू आहे. याच ...

संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी बार, बीअर शॉपी सील
तिवसा : शहरातील काही व्यावसायिक संचारबंदी नियमांचे उल्लंघन करीत असल्याने नगरपंचायत पथकाद्वारे कारवाईची मोहीम सुरू आहे. याच पथकाने मंगळवारी दुपारी शेंदूरजना बाजार मार्गालगत असलेल्या बार व बीअर शॉपीला दंड ठोठावला.
तिवसा नगरपंचायतीच्या पथकाद्वारे व्यावसायिकांवर दंड ठोठावून कारवाई सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांना शेंदूरजना बाजार मार्गालगत असलेल्या बारवर संचारबंदी नियमाचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. यानंतर पोलीस व नगरपंचायत कारवाई पथकाने दहा हजार रुपयांचा दंड ठोठावून बार सील केले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर असलेल्या बीअर शॉपीवरसुद्धा कारवाई करण्यात आली. ही कारवाई नगरपंचायत मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांच्या मार्गदर्शनात कार्यालय अधीक्षक संजय पवार, दीपक खोब्रागडे, सुधीर विघ्ने, सचिन मकेश्वर, अभिजित गौरखेडे, सचिन देशमुख यांनी केली.