पीक विम्यासाठी रविवारी बँका सुरू राहणार
By Admin | Updated: July 29, 2016 23:59 IST2016-07-29T23:59:22+5:302016-07-29T23:59:22+5:30
पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत आहे.

पीक विम्यासाठी रविवारी बँका सुरू राहणार
अमरावती : पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत आहे. मात्र २९ जुलै रोजी बँकांचा संप असल्याने शेतकऱ्यांना अर्ज व विमा हप्ता भरता आला नाही.
३१ जुलै रोजी रविवार असल्याने शेतकरी योजनेपासून वंचित राहू नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सर्व बँका या योजनेच्या कामासाठी सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)