बँका बंद, २० लाख खातेदारांना फटका
By Admin | Updated: November 12, 2014 22:35 IST2014-11-12T22:35:19+5:302014-11-12T22:35:19+5:30
जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी वेतनवाढीच्या मुद्यावरुन बेमुदत संप पुकारल्याने सुमारे २० लाख खातेदारांना याचा फटका बसला. त्यामुळे संपाच्या पहिल्याच दिवशी ४५० कोटींचे आर्थिक व्यवहार

बँका बंद, २० लाख खातेदारांना फटका
अमरावती : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी वेतनवाढीच्या मुद्यावरुन बेमुदत संप पुकारल्याने सुमारे २० लाख खातेदारांना याचा फटका बसला. त्यामुळे संपाच्या पहिल्याच दिवशी ४५० कोटींचे आर्थिक व्यवहार प्रभावित झाले आहेत. बुधवारी जयस्तंभ चौक येथील बँक आॅफ इंडिया समोर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने केलीत.
जिल्ह्यात १७ राष्ट्रीयीकृत बँका असून बुधवारी सकाळपासून बँक कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला. बँक कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागणीत वाढीव वेतनाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी संपाचे हत्यार उपसले आहे. राष्ट्रीयकृत बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय बंदला सुरुवात करुन बुधवारी सकाळी जयस्तंभ चौकातील बँक आॅफ इंडिया समोर निदर्शने केलीत. यावेळी युनायडेट फोरम आॅफ बँक युनियनच्या नऊ संघटनांनी सहभाग नोंदविला. संपामध्ये जिल्ह्यातील १७ राष्ट्रीयीकृत बँकांमधील सुमारे ६ हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. या संपामुळे सामान्य नागरिक हैराण होतील.